किमान तापमान : 27.99° से.
कमाल तापमान : 28.01° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 61 %
वायू वेग : 3.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.95°से. - 30.83°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर कुछ बादल27.32°से. - 30.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.51°से. - 29.25°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.09°से. - 29.82°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.89°से. - 29.89°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश26.01°से. - 29.34°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादल१२ हलक्या हेलिकॉप्टर्सचा समावेश, संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय,
नवी दिल्ली, २ नोव्हेंबर – संरक्षण मंत्रालयाने आज मंगळवारी ७,९६५ कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्र आणि लष्करी उपकरणांच्या खरेदीला मंजुरी दिली. यात हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडकडून मिळणार्या १२ हलक्या हेलिकॉप्टर्सचा समावेश आहे. संरक्षण खरेदी समितीच्या (डीएसी) बैठकीत या खरेदीला मान्यता देण्यात आली, अशी माहिती अधिकृत निवेदनात देण्यात आली.
हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडकडून १२ हलकी हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याव्यतिरिक्त डीएसीने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकडून लिनक्स यू-२ नेव्हल गनफायर नियंत्रण यंत्रणेची खरेदी करण्यासही मंजुरी देण्यात आली. या यंत्रणेच्या खरेदीमुळे भारतीय नौदलाची शत्रूंच्या नौकांचा माग घेण्याची आणि लढाऊ क्षमता वाढणार आहे, असे संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. समुद्रात आणि तटवर्ती भागांत नजर ठेवून नौदलाची क्षमता वाढवण्यासाठी हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडकडून डॉर्निअर विमानांचे आयुष्य वाढवण्यासाठी आधुनिकीकरण करण्यासही डीएसीने मंजुरी दिली आहे.
आत्मनिर्भर भारताला बळकटी
आत्मनिर्भर भारताला बळ देण्यासाठी नौदलासाठी वापरण्यात येणार्या तोफांची विदेशातून होणारी खरेदी बंद करण्यात आली आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडकडून (भेल) या तोफांच्या आधुनिकीकरणासह सुपर रॅपिड गन माऊंटचे (एसजीआरएम) उत्पादन केले जाणार आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. एसजीआरएममध्ये दिशादर्शक यंत्रणा असून, त्या माध्यमातून वेगात लक्ष्य गाठण्यासाठी मदत मिळते आणि मारा करण्याची क्षमताही वाढते. ही यंत्रणा भारतीय नौदलाच्या युद्धनौकांवर लावली जाणार आहे, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली. संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या नेतृत्वात डीएसीची बैठक आज मंगळवारी झाली.