किमान तापमान : 24.16° से.
कमाल तापमान : 26.05° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.05° से.
23.71°से. - 26.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– १७ व्या फिल्म बाजार २०२३ अंतर्गत, संपूर्ण लांबीच्या फीचर फिल्म्सचा उपक्रम,
मुंबई, (२५ ऑक्टोबर) – गोव्यात, मारिओट रिसॉर्ट इथे नोव्हेंबर २० ते २४ , २०२३ या कालावधीत होणार्या एनएफडीसी म्हणजेच राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळच्या १७ व्या फिल्म बाजार या उपक्रमासाठी, संपूर्ण लांबीच्या चित्रपट सहनिर्मिती बाजाराची घोषणा आज करण्यात आली.
सतराव्या फिल्म बाजार मध्ये, जगभरातील २० चित्रपटांचा समावेश आहे. सहनिर्मिती मार्केट फीचर फिल्म्स मध्ये, यंदा ११ देशातील विविध भाषा आणि विषयांवरील चित्रपटांचा समावेश असून ते या फिल्म बाजार मध्ये सहभागी होणार आहेत. यात, भारत, बांगलादेश, श्रीलंका, अमेरिका,इंग्लंड सिंगापूर, जर्मनी, फ्रान्स, पोलंड, लक्झेंबर्ग आणि इस्रायलमधील कथांचा समावेश आहे. निवडलेले चित्रपट निर्माते त्यांच्या प्रकल्पाची (चित्रपट) आंतरराष्ट्रीय आणि भारतीय निर्माते, वितरक, महोत्सव आयोजक, फायनान्सर आणि विक्रेते यांच्याकडे जाहिरात आणि प्रचार करतील.
इफ्फी चित्रपट महोत्सवाचे संचालक आणि फिल्म बाजार आणि सहसचिव (चित्रपट) तसेच एनएफडीसी चे महासंचालक प्रितुल कुमार म्हणाले की, सहनिर्मिती बाजार हा निवडलेल्या प्रकल्पांना आर्थिक सहाय्य देण्यासाठीच्या फिल्म बाजारच्या सर्वात महत्त्वाच्या विभागांपैकी एक आहे. त्यात सातत्याने वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प आणले आहेत.
यावर्षी देखील आम्हाला, १९ देश आणि २७ भाषांमधून विक्रमी संख्येने १४२ अर्ज आले होते. त्यातून निवड झालेल्या सर्व चित्रपट निर्मात्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांच्या चित्रपटांसाठी त्यांना एक अनुकूल, उत्तम सहनिर्माते मिळतील आणि त्यांचा प्रकल्प पूर्ण होईल, अशी आशा व्यक्त करतो..
२०२३ या वर्षासाठी निवड करण्यात आलेले काही निवडक प्रकल्प खालीलप्रमाणे:–
आठ (ढहश एळसहीं) | मराठी | भारत
दिग्दर्शक – नचिकेत वाईकर
नचिकेत वाईकर यांनी ’तेंडल्या’ या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाचे दिग्दर्शन, संपादन आणि पटकथा लिहिली आहे, ज्यासाठी त्यांना ५६ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट संपादनाचे पुरस्कारही मिळाले आहेत. नचिकेत यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे येथून फिल्म एडिटिंगमध्ये पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. ऋढखख मधील त्यांचे चित्रपट/लघुपट जसे लेटर फ्रॉम कोरलाई, गोल्डन मँगो, क्र-म-श: जगभरातील असंख्य चित्रपट महोत्सवांमध्ये नावाजले गेले आहेत.
निर्माते -नीरज जैन | माइं(ड) स्टुडिओ
नीरज जैन हे लॉस एंजेलिस आणि न्यूयॉर्क येथे राहणारे भारतीय-अमेरिकन सिनेमॅटोग्राफर आणि निर्माते आहेत. त्यांनी अमेरिका आणि भारत या दोन्ही ठिकाणी चित्रीकरण केले आहे. द साउंड ऑफ द विंड (२०२०) या त्यांच्या पहिल्याच वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाचे, त्याच्या परिणामकारक दृश्यांसाठी रसिक-समीक्षकांनी विशेष कौतुक केले होते. अगदी अलीकडे, त्यांनी ऍमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवरच्या झोया अख्तर दिग्दर्शित मेड इन हेवन (२०२२) च्या दुसर्या सीझनचे चित्रीकरणही केले आहे.
निर्मात्या — माया पटेल माइं(ड) स्टुडिओ
माया पटेल या मुंबई, लंडन आणि लॉस एंजेलिस इथल्या निर्मात्या आहेत. त्या न्यूयॉर्कच्या चळप(व) स्टुडिओ च्या संस्थापक भागीदार देखील आहेत. अलीकडेच त्यांनी नोबेल शांतता पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांच्या जीवनावर आणि बाल गुलामगिरी संपवण्याच्या त्यांच्या लढ्यावर आधारित एमी-नामांकित चित्रपट द प्राइस ऑफ फ्री साठी काम केले. या चित्रपटाने २०१८ साली सनडान्स फिल्म फेस्टिव्हल ग्रँड ज्युरी पारितोषिक जिंकले. त्यांनी नेटफ्लिक्सचा बिक्रम, शोटाइमचा द किंगमेकर यासह इतर पुरस्कारप्राप्त चित्रपट निर्मितीसाठी काम केले आहे. अकादमी (ऑस्कर) पुरस्कार विजेते दिग्दर्शक, डेव्हिस गुगेनहेम, स्मृती मुंध्रा, लॉरेन ग्रीनफिल्ड आणि इवा ऑर्नर यांसारख्या दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केले आहे.
फाशीगेट | मराठी | भारत
दिग्दर्शक – फुलवा खामकर
फुलवा खामकर यांना, जिम्नॅस्टिक्समध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल १९९२-९३ साली, महाराष्ट्र शासनाच्या प्रतिष्ठित शिवछत्रपती पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. व्यवसायाने नृत्यदिग्दर्शिका आणि नृत्य शिक्षिका असलेल्या फुलवा यांनी, ’नटरंग, मितवा, क्लासमेट्स, हंपी’ सारख्या चित्रपटांसाठी नृत्य दिग्दर्शन केले आहे. त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. भारतातील पहिल्या डान्स रिअॅलिटी शो ‘बूगी वूगी’ मध्ये आपले पहिले नृत्य सादरीकारण केले होते. २०२२ मध्ये त्यांनी ’मासा’ हा लघुपट दिग्दर्शित केला. अनेक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये या चित्रपटाला मान्यता आणि पुरस्कार मिळाले आहेत.
निर्माते — अमर खामकर | गोल्डन लिली एन्टरटेनमेंट
अमर खामकर यांनी फुलवा खामकर दिग्दर्शित ’मासा’ या लघुपटाची निर्मिती केली आहे.
लॉस्ट अँड फाऊंड | हिन्दी |भारत
दिग्दर्शिका – गीतांजली राव
गीतांजली राव या ‘बॉम्बे रोझ’ या अॅनिमेशन फीचर फिल्मच्या लेखिका आणि दिग्दर्शिका आहेत. या चित्रपटाला, ‘व्हेनिस क्रिटिक्स वीक २०१९’ मध्ये प्रारंभीचा चित्रपट म्हणून स्थान मिळाले होते. त्यानंतर टोरंटो, बुसान, मकाओ, मॅराकेच आणि ५० हून अधिक आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये हा चित्रपट दाखवला गेला. ५३ व्या शिकागो महोत्सवात सिल्व्हर ह्यूगोसह या चित्रपटाने ७ पुरस्कार जिंकले आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्स वर उपलब्ध आहे. गीतांजली यांचा अॅनिमेटेड लघुपट ‘प्रिंटेड रेनबो’ चा २००६ च्या कान महोत्सवात प्रीमियर शो झाला आणि कान क्रिटिक्स वीकमध्ये या लघुपटाने तीन पुरस्कारही जिंकले. त्याशिवाय, विविध आंतरराष्ट्रीय महोत्सवात २५ पुरस्कार जिंकत, २००८ च्या ऑस्कर साठी नामांकनही ह्या चित्रपटाने मिळवले आहे. त्यांचा अलिकडचा लघु अॅनिमेशन, टॉमॉरो माय लव्ह चा ७४ व्या लोकार्नो फिल्म फेस्टिव्हल २०२१ मध्ये वर्ल्ड प्रीमियर झाला. या लघुपटासाठी त्यांना ७५ व्या लोकार्नो फिल्म फेस्टिव्हल २०२२ मध्ये पारडो डी’ओर – लोकार्नो किड्स पुरस्कारही मिळाला.
निर्माती- अश्विनी सिडवानी | एसएमआर एंटरटेनमेंट
अश्विनी सिडवानी निर्मित पिंपळ या चित्रपटाने पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटासह ६ पुरस्कार पटकावले असून, एका वयाने ज्येष्ठ असलेली व्यक्ती आपल्या मुळाचा शोध घेते, याभोवती या चित्रपटाचे कथानक गुंफण्यात आले आहे. अश्विनी सिडवानी वेलकम होम, या एका स्त्रीच्या आपल्या घराविषयीच्या शोधावरील मराठी चित्रपटाची सहनिर्माती आहे. तिच्या ‘द सायलेन्स’ या पहिल्या चित्रपटाने १५ हून अधिक पुरस्कार जिंकले आहेत. २०१७ मध्ये भारतात प्रदर्शित झालेल्या सर्वोत्तम १० चित्रपटांमध्ये स्थान मिळवणारा, द सायलेन्स हा चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी आणि मराठी भाषेत उपलब्ध आहे. अश्विनी सिडवानी, या एसएमआर प्रॉडक्शन्समध्ये भागीदार असून, २०२० च्या सुरुवातीला प्रदर्शित झालेल्या नागराज मंजुळे यांच्या झुंड या चित्रपटाच्या त्या कार्यकारी निर्मात्या राहिल्या आहेत.
द प्रिस्ट एंड द प्रोस्टीट्युट| इंग्रजी, मल्याळम, हिंदी | भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता – अरुणराजे पाटील | गाहीमीडिया
अरुणराजे पाटील या समीक्षकांची प्रशंसा लाभलेल्या पुरस्कार विजेत्या चित्रपट निर्माती असून, त्या लेखक, संपादक, दिग्दर्शक आणि निर्माता आहेत. त्या फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या सुवर्णपदक विजेत्या माजी विद्यार्थिनी असून, चित्रपट उद्योगातील पहिली महिला तंत्रज्ञ म्हणून त्यांना सरकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी जाहिरातपट, माहितीपट, दूरदर्शन मालिका आणि चित्रपट बनवले आहेत. यामध्ये शक, गहराईया, सितम (सह निर्माती), आणि रिहाई (विनोद खन्ना, हेमा मालिनी, नसिरुद्दीन शाह), पतित पावन एंड पतित पावनी, भैरवी (अश्विनी भावे, श्रीधर), कह दो ना (सिमॉन सिंह, परवीन डाबस), तुम (मनीषा कोईराला, रजत कपूर), आणि नेटफ्लिक्स वरील प्रियांका चोप्रा निर्मित फायरब्रान्ड (उषा जाधव, गिरीश कुलकर्णी) या चित्रपटांचा समावेश आहे. वंश वृक्ष, गीध एंड मासूम या चित्रपटांचे त्यांनी संपादन केले आहे.
’मल्लिका साराभाई’, ’अ न्यू पॅराडाइम’ आणि ’बिहाइंड द ग्लास वॉल’ या माहितीपटांसाठी त्यांना ६ राष्ट्रीय पुरस्कार तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे, तसेच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसह अनेक पुरस्कारांच्या निवड समितीवर त्यांनी काम केले आहे.
फिल्म बाजार
२००७ मध्ये स्थापन झाल्यापासून, फिल्म बाजार दक्षिण आशियाई चित्रपट आणि चित्रपट निर्मिती आणि वितरणातील प्रतिभा शोधणे, त्याला प्रोत्साहन देणे आणि त्याचे प्रदर्शन करण्यावर भर देत आहे. फिल्म बाजार दक्षिण आशियामध्ये जागतिक चित्रपटांच्या विक्रीलाही सहाय्य करतो. या प्रदेशात जागतिक चित्रपटांची विक्री सुलभ करणे, हे याचे उद्दिष्ट आहे. फिल्म बाजार हा दक्षिण आशियाई आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्माते आणि विक्री एजंट आणि संभाव्य सृजनशील महोत्सव आयोजक आणि आर्थिक घटकांना एकत्र आणण्याचे सामायिक व्यासपीठ आहे. फिल्म बाजार पाच दिवसांमध्ये, दक्षिण आशियाई आशय संपन्न साहित्य आणि चित्रपट निर्मिती आणि वितरणातील प्रतिभा शोधणे, त्याला प्रोत्साहन देणे आणि प्रदर्शित करणे यावर लक्ष केंद्रित करते.
एनएफडीसी
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने १९७५ मध्ये, नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएफडीसी) ची स्थापना केली. भारतीय सिनेमाचा प्रचार करणे आणि जगभरात त्याचे प्रदर्शन करणे हे याचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
२१ प्रादेशिक भाषांमधील ३०० हून अधिक चित्रपटांना आर्थिक सहाय्य देण्यासह, एनएफडीसी ने संपूर्ण देशभरात स्वतंत्र चित्रपटांचा विकास, त्याचा वित्तपुरवठा आणि वितरणाला प्रोत्साहन देणारी एक परिसंस्था निर्माण करण्यासाठी सहाय्य केले आहे. या चित्रपटांना अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाले आहेत. फिल्म बाजार हा एनएफडीसी चा सह-निर्मिती उपक्रम, हा या प्रक्रियेचा अविभाज्य भाग आहे.
Short URL : https://vrittabharati.in/?p=56828