किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश-सलग सहाव्यांदा रेपो दर ‘जैसे थे’ – रिझर्व्ह बँकेचे द्विमासिक पतधोरण जाहीर,
मुंबई, (०८ फेब्रुवारी) – भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने सलग सहाव्यांदा रेपो दरात कोणताही बदल न करता तो ६.५० टक्के कायम ठेवला आहे. याबाबतचा निर्णय गुरुवारी शक्तीकांत दास यांनी जाहीर केला. पतधोरण आढावा समितीच्या सहा सदस्यांनी ५-१ असा बहुमताने रेपो दर ६.५० टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.
रिझर्व्ह बँकेने जोखीम समतोल राखून आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी ७ टक्के वास्तविक जीडीपी वाढीचा अंदाज बांधला आहे. चालू आर्थिक वर्षात किरकोळ चलनवाढीचा दर ५.४ आणि २०२४-२५ साठी ५.५ टक्के असेल. महागाईत घट होण्याचा शेवटचा टप्पा यशस्वीपणे पार करण्यासाठी पतधोरण सावध असले पाहिजे, असे शक्तीकांत दास यांनी सांगितले.
जागतिक वाढ २०२४ मध्ये स्थिर राहण्याची शक्यता आहे. विविध क्षेत्रांमध्ये विषमता आहे. जागतिक व्यापाराची गती कमकुवत असली तरी, सावरण्याची चिन्हे दिसत आहेत आणि २०२४ मध्ये ती अधिक वेगाने वाढण्याची शक्यता आहे.
ऑफलाईन ई-रुपी व्यवहार लवकरच
डिजिटल रुपयाचे वापरकर्ते लवकरच मर्यादित इंटरनेट कनेक्टिव्हिटी असलेल्या भाागांत व्यवहार करू शकतील. कारण, ऑफलाईन व्यवहाराची क्षमता असलेल्या ‘सेंट्रल बँक डिजिटल करन्सी’चा (सीबीडीसी) पथदर्शक प्रकल्प राबवणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेेने दिली.
द्विमासिक पतधोरणाची ठळक वैशिष्ट्ये
– रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम
– यंदा जीडीपी वाढ ७.३ टक्क्यांपेक्षा कमी दरानेराहणार
– किरकोळ चलनवाढीचा दर ५.४ टक्के
-सध्याचा आर्थिक वेग पुढील वर्षात कायम राहणार
– २०२४-२५ मध्ये रबीचा पेरा वाढल्याने उत्पादनात सातत्यपूर्ण नफा
– भारतीय अर्थव्यवस्था मजबूत, शाश्वत विकासाच्या मार्गावर
– खाद्यपदार्थांच्या किमतींमधील अनिश्चितेचा महागाईवर परिणाम
– पतधोरण समितीची पुढील बैठक ३ ते ५ एप्रिल दरम्यान