किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (०८ फेब्रुवारी) – अंतर्गत सुरक्षा आणि ईशान्येच्या राज्यांमधील लोकसं‘याशास्त्रीय संरचना कायम ठेवण्यासाठी भारत-म्यानमार सीमेवरील ‘फ्री मूव्हमेंट रेजिम’ (एफएमआर) रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी केली.
एफएमआर तातडीने निलंबित करण्यात यावे, अशी शिफारस गृह मंत्रालयाने केल्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्रालय सध्या ते रद्द करण्याची प्रकि‘या केली जात आहे, असे अमित शाह यांनी सांगितले. कोणतेही दस्तावेज न बाळगता परस्परांच्या सीमांमध्ये १६ किमी खोलवर जाण्याची परवानगी एफएमआरद्वारे नागरिकांना देण्यात आली आहे.
आपल्या सीमा सुरक्षित करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. देशाची अंतर्गत सुरक्षा आणि म्यानमारच्या सीमेवर असलेल्या ईशान्येतील राज्यांची लोकसं‘याशास्त्रीय संरचना कायम ठेवण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने एफएमआर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, असे अमित शाह यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
भारत-म्यानमारमधील १,६४३ किमी लांबीच्या सीमेवर कुंपण घालण्याचा निर्णय अमित शाह यांनी घेतल्यानंतर दोन दिवसांनी ही घोषणा करण्यात आली. भारत-म्यानमार सीमा मिझोरम, मणिपूर, नागालॅण्ड आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमधून जाते. सध्या यावर एफएमआर आहे. भारताच्या लूक ईस्ट धोरणानुसार २०१८ मध्ये याची अंमलबजावणी करण्यात आली होती.
आदिवासी बंडखोर या सच्छिद्र सीमेवरून घुसखोरी करतात, असा आरोप करीत इम्फाळमधील मैतेई समुदायाने या सीमेवर कुंपण टाकण्यात यावे, अशी मागणी केली होती. आंतरराष्ट्रीय सीमेवर कुंपण नसल्याचा फायदा घेत, येथून मादकपदार्थांची तस्करीही केली जात असल्याचा दावा मैतेई समुदायाने केला होता.
संपूर्ण सीमेवर कुंपण टाकण्यासोबतच या सीमेवर गस्त घालण्यासाठी मार्गही उभारले जातील, असे गृह मंत्रालयाने मंगळवारी सांगितले होते. या व्यतिरिक्त निगराणी ठेवण्यासाठी संमिश्र यंत्रणा उभारण्याचे दोन पथदर्शक प्रकल्पही हाती घेण्यात आले आहेत, असे गृह मंत्रालयाने मंगळवारी सांगितले होते.
एन. बिरेनसिंह यांनी मानले मोदींचे आभार
भारत-म्यानमारमधील एफएमआर रद्द करण्याबात आणि सीमा सुरक्षित करण्याच्या वचनबद्धतेबाबत मणिपूरचे मु‘यमंत्री एन. बिरेनसिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांचे आभार मानले. सीमा सुरक्षित करण्याबाबतचे वचन पूर्ण केल्याबद्दल मी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा आभारी आहे. केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बेकायदेशीर इमिग‘ेशनला आळा घालण्यासाठी घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे बिरेनसिंह यांनी सांगितले.