किमान तापमान : 24.16° से.
कमाल तापमान : 26.05° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.05° से.
23.71°से. - 26.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (३१ ऑक्टोबर) – मथुरा येथील श्री कृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह यांच्यातील जमीन वादाची प्रकरणे अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणीसाठी हस्तांतरित करण्याच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात निष्काळजीपणाची चौकशी सुरू आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरल यांनी सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागणारे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राची प्रत पुढे आली आहे. रजिस्ट्रार जनरल राजीव भारती यांनी प्रतिज्ञापत्रात लिहिले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उच्च न्यायालय प्रशासनाच्या निदर्शनास येताच प्राथमिक तपास करण्यात आला. २१ जुलै आणि ३ ऑक्टोबरच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन कोणाच्या निष्काळजीपणाने झाले नाही, याचाही तपास रजिस्ट्रारच्या देखरेखीखाली सुरू आहे. अहवाल आल्यावर संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल
अलाहाबाद उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल म्हणाले की, मथुरा श्री कृष्ण जन्मभूमी वादाशी संबंधित एकूण १८ खटले जिल्हा न्यायालयात दाखल होते, ते उच्च न्यायालयात वर्ग करण्यात आले आहेत. सुप्रीम कोर्टात १० नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. वास्तविक, इदगाह समिती या प्रकरणाशी संबंधित सर्व खटले मथुरा जिल्हा न्यायालयाकडून अलाहाबाद उच्च न्यायालयात स्थानांतरित करण्यास विरोध करत आहे. मथुरा कोर्टात सुनावणी व्हावी, असे इदगाह कमिटीचे म्हणणे आहे. जुलैमध्ये सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारला श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणाशी संबंधित प्रकरणांची यादी देण्याचे आदेश दिले होते. तथापि, मागील सुनावणीदरम्यान, मुस्लिम बाजूने निधीची कमतरता असल्याचे कारण देत अलाहाबाद उच्च न्यायालयाऐवजी दिल्ली उच्च न्यायालयात हस्तांतरण करण्यास सांगितले होते.