किमान तापमान : 24.16° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 54 %
वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
23.71°से. - 26.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलआयुर्वेद संस्थान पथकाचा अनुभव,
नवी दिल्ली,१ नोव्हेंबर – ‘आयुष कवठ’ आणि ‘फिफाट्रोल’ ही आयुर्वेदिक औषधे कोरोनाच्या सौम्य ते मध्यम लक्षणांच्या पूर्ण प्रतिरोधासह अगदी अल्प कालावधीतही प्रभावी ठरू शकतात, असे आयुष मंत्रालयांतर्गत दिल्लीस्थत अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या (एआयआयए) डॉक्टरांच्या पथकाला आढळून आले आहे.
‘आयुष कवठ’, ‘फिफाट्रोल गोळ्या’, ‘संशमनी वटी’ आणि ‘लक्ष्मीविलास रस’ या चार आयुर्वेदिक औषधांच्या साह्याने कोरोना रुग्णांची प्रकृती तर सुधारलीच, शिवाय उपचारानंतर सहा दिवसांच्या आतच त्यांची जलद प्रतिजन चाचणीही (रॅपिड अँटिजन टेस्ट) नकारात्मक आली, असे एआयआयएच्या ऑक्टोबरमध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘आयुर्वेद प्रकरण अहवालात’ म्हटले आहे. लक्षावधी लोकांचे बळी घेणार्या आणि प्रचंड संख्येत लोकांना बाधित करणार्या या आजारावर सध्यातरी कोणताही खास उपचार उपलब्ध नाही.
कोरोना विषाणूने संक्रमित ३० वर्षीय पुरुष आरोग्य कर्मचार्याच्या प्रकरणाचा हवाला देताना अहवालात म्हटले आहे की, या कर्मचार्याचे संक्रमण आयुष कवठ, फिफाट्रोल, संशमनी वटी आणि लक्ष्मीविलास रसच्या माध्यमातून पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात आले. या आरोग्य कर्मचार्याचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आल्यानंतर त्याला घरीच विलग राहण्याचा सल्ला देण्यात आला होता.
वर उल्लेखित उपचारयोजना लक्षणेमुक्त तसेच विषाणूच्या निराकरणात प्रभावी ठरली. कारण रुग्णाने सहा दिवसांच्या आतच ‘रॅपिड अँटिजन टेस्ट’ केली होती. आणि या चाचणीचा अहवाल नकारात्मक आला, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
एआयएमआयएल फार्मास्युटिकलने विकसित केलेले ‘फिफाट्रोल’ हे आयुर्वेदिक (गोळ्या) औषध संसर्ग, फ्लू आणि सर्दीशी लढायला मदत करते. यातील गुडुची, संजीवनी घनवटी, दारुहरिद्र, अपमार्ग, चिरायता, कारंजा, कुतकी, तुलसी, गोदंती (भस्म), मृत्युंजय रस, त्रिभुवन कृती रस आणि संजीवनी वटी या औषधी वनस्पतींनी हे औषध अतिशय प्रभावशाली ठरले आहे.
आयुष कवठ हे चार औषधी वनस्पतींचे मिश्रण आहे जे सामान्यतः प्रत्येक भारतीयाच्या स्वयंपाकघरात वापरले जाते. तुळशीची पाने (तुळशी), दालचिनीचे साल (दालचिनी), सुंठ आणि कृष्णा मरिच (पाइपर निग्राम) याच्या मदतीने हे औषध तयार करण्यात आले आहे. व कोरोना प्रतिबंधातसाठी ते उपयुक्त सिद्ध झाले आहे. हा अहवाल एआयआयएचे डॉ. शिशिरकुमार मंडल, डॉ. मीनाक्षी शर्मा, डॉ. चारू शर्मा, डॉ. शालिनी राय आणि डॉ. आनंद मोरे यांनी लिहिला आहे.