|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:10 पी एम
हवामान

किमान तापमान : 24.16° से.

कमाल तापमान : 26.99° से.

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 54 %

वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

26.99° से.

हवामानाचा अंदाज

23.71°से. - 26.99°से.

रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

22.24°से. - 25.52°से.

सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

23.44°से. - 26.98°से.

मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

24.12°से. - 25.88°से.

बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल
हवामानाचा अंदाज

24.11°से. - 25.32°से.

गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.75°से. - 26.28°से.

शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल
Home » नागरी, राष्ट्रीय » पुलवामा हल्ल्याचे स्वार्थासाठी राजकारण

पुलवामा हल्ल्याचे स्वार्थासाठी राजकारण

पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला,
केवडिया, ३१ ऑक्टोबर – पुलवामा हल्ला पाकिस्ताननेच केला होता, ही सत्यता त्यांच्याच एका वरिष्ठ मंत्र्याने संसदेत सांगितली. सीआरपीएफचे ४० जवान यात शहीद झाले होते. संपूर्ण देश दु:खात होता आणि काही लोक या घटनेवरही स्वार्थाचे राजकारण करीत होते. या लोकांनी शहीदांचा अपमान केला, असा घणाघाती हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कॉंगे्रसचे खासदार राहुल गांधींवर चढविला.
प्रधानमंत्री मोदी यांनी गुजरात दौर्‍याच्या दुसर्‍या दिवशी सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या १४५ व्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण केली. यावेळी ते बोलत होते.
वापरली पाकिस्तानला आवडणारी भाषा
आज मी या ठिकाणी आपल्या जवानांचे ध्वजसंचलन पाहात होतो, त्यावेळी माझ्या मनात पुलवामा हल्ल्याचे दृश्य दिसत होते. वीर जवान शहीद झाल्याने संपूर्ण देश दु:खी होता.
मात्र, काही लोक या दु:खात सहभागी नव्हते. ते या हल्ल्यात आपला राजकीय स्वार्थ पाहात होते, पाकिस्तानला आवडेल, अशी भाषा बोलत होते, असा आरोप पंतप्रधानांनी केला.
देश वक्तव्ये विसरणार नाही
त्यावेळी काय-काय गोष्टी बोलल्या गेल्या, कशी वक्तव्ये केली गेली, हे देश कधीच विसरू शकत नाही. देशावर इतका मोठा आघात झाला असताना, स्वार्थ आणि अहंकाराचे राजकारण केले जात होते, असे मोदी म्हणाले.
चीनलाही इशारा
यावेळी मोदींनी राष्ट्रीय एकता दिन परेडकडून मानवंदना स्वीकारली. सीमेवर भारताची नजर आणि दृष्टिकोन बदलला आहे. आमच्याकडे डोळे वटारून पाहणार्‍यांना जशासतसे उत्तर दिले जाते, असे सांगताना त्यांनी चीनलाही कडक इशारा दिला.
देशातील पहिली ‘सी-प्लेन’ सेवा सुरू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील केवडियाजवळ देशातील पहिली ‘सी-प्लेन’ सेवा राष्ट्राला अर्पण केली. स्टॅच्यू ऑफ युनिटी ते अहमबादेतील साबरमती रिव्हरफ्रंट या दरम्यान या ‘सी-प्लेन’ची सेवा राहणार आहे.
एकता दिवस महोत्सवात सहभागी झाल्यानंतर सरदार सरोवर धरणाजवळून मोदी तीन इंजिन असलेल्या या ‘सी-प्लेन’मध्ये बसले. त्यापूर्वी मोदी यांनी काही वेळ तेथील जल हवाईपट्टीवर घालविला आणि या विमानाच्या सेवेविषयी माहिती जाणून घेतली. वैमानिक आणि इतर अधिकार्‍यांसोबतही त्यांनी चर्चा केली. सुमारे २०० किलोमीटरचे अंतर अवघ्या ४० मिनिटांत पूर्ण करून हे विमान साबरमती रिव्हरफ्रंट येथे पोहोचले.

Posted by : | on : 31 Oct 2020
Filed under : नागरी, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g