किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल-पहिल्या मानवी मोहिमेबाबत इस्रोची माहिती,
बंगळुरू, (०९ ऑक्टोबर) – चांद्रयान-३ मोहिमेच्या यशानंतर आता इस्रोच्या गगनयान मोहिमेकडे नजरा लागल्या आहेत. इस्रोच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेची तयारी जोरदार सुरू आहे. गगनयान मोहिमेसाठीची महत्त्वाची अबॉर्ट चाचणी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी घेण्यात येणार असल्याची माहिती इस्रोने दिली आहे. इस्रोला गगनयानसाठी पहिले क्रू मॉड्युल मिळाले असून, त्याची पहिली अबॉर्ट चाचणी २५-२६ ऑक्टोबर या काळात होण्याची शक्यता आहे. गगनयान ही भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम असल्याने याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. इस्रोच्या ऑक्टोबरच्या अखेरीस गगनयान मोहिमेसाठी क्रू एस्केप सिस्टिमची अबॉर्ट चाचणी घेण्यास सज्ज आहे.
अबॉर्ट चाचणीत सुमारे १७ किमी उंचीवर चाचणी वाहनापासून क्रू मॉड्युल वेगळे होणे अपेक्षित असेल. गगनयान मोहिमेत जर कोणतीही अडचण आली तर, अंतराळवीरांना मॉड्युलसह सुरक्षित पृथ्वीवर आणण्यासाठी क्रू मॉड्युल अबॉर्ट चाचणी केली जात आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास गगनयान मोहिमेसाठी एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरेल.
कशी असेल चाचणी?
या चाचणीत गगनयान अवकाशात भरारी घेईल. त्यानंतर ठराविक उंची गाठल्यानंतर हे क‘ू मॉड्युल प्रक्षेपण वाहनापासून वेगळे होऊन समुद्रात लॅण्ड होईल. बंगालच्या उपसागरात क्रू मॉड्युल उतरल्यावर भारतीय नौदलाचे जहाज आणि डायव्हिंग टीम वापरून क्रू मॉड्युल पुन्हा ताब्यात घेईल.
इस्रोच्या गगनयान मोहिमेचे तीन टप्पे असणार आहेत. यात दोन मानवरहित अंतराळयान अवकाशात पाठवले जाईल आणि त्यानंतर तिसर्या वेळी मानवाला अवकाशात पाठवले जाईल. सुरुवातीच्या अंतराळ मोहिमेत इस्रो व्योमित्र नावाचा रोबोट अंतराळात पाठवणार आहे. मानवासाठी या मोहिमेची सुरक्षितता तपासण्यासाठी आणि आवश्यक बदल करण्यासाठी आधी रोबोट अवकाशात पाठवला जाईल.