किमान तापमान : 24.16° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 54 %
वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
23.71°से. - 26.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– हवामानात बदल, थंडी वाढणार,
मुंबई, (१९ नोव्हेंबर) – गेल्या काही दिवसांपासून देशातील हवामानात मोठा बदल झाला आहे. कुठे ऊन, कुठे पाऊस, तर कुठे थंडी असे वेगवेगळे वातावरण पाहायला मिळत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे देशात काही भागांत अवकाळी पाऊस पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळणार असून, पावसाची शक्यता नाही.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, त्रिपुरा किनारपट्टी भागातील कमी दाबाचे क्षेत्र आजच्या १७३० तासांवर कमी चिन्हांकित झाले आहे. चक्रीवादळ समुद्रसपाटीपासून १.५ किमी अंतरावर आहे. महाराष्ट्रात पारा घसरणार आहे. मुंबई, पुण्यासह राज्यात थंडीचा कडाका वाढणार आहे. मुंबई, पुण्यात पुढील २४ तासांत किमान तापमानात किंचित घट होईल, असे हवामानशास्त्र विभागाने सांगितले. सोबतच नागपूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर या भागातही सकाळी आणि सायंकाळी थंडीचा जोर वाढणार असून, दुपारी आकाश स्वच्छ असेल.
तामिळनाडू, केरळमध्ये मुसळधार
पुढील दोन दिवस तामिळनाडू आणि केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. २१ नोव्हेंबर रोजी आंध‘प्रदेश आणि २२ नोव्हेंबर रोजी तामिळनाडू किनारपट्टी भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.