किमान तापमान : 28.48° से.
कमाल तापमान : 29.49° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 4.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.49° से.
27.34°से. - 30.47°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (१९ नोव्हेंबर) – आयटी हार्डवेअर क्षेत्रात लवकरच नव्या नोकर्या निर्माण होऊ शकतात. आयटी क्षेत्रातील दिग्गज डेल, एचपी, लेनोवो, फॉक्सकॉन आदी २७ कंपन्यांना सरकारच्या प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय) योजनेसाठी मंजुरी मिळाली आहे. पीएलआय आयटी हार्डवेअर योजनेद्वारे एकूण २७ कंपन्यांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, पीएलआय योजनेंतर्गत मंजुरी मिळाल्यानंतर जवळपास ९५ टक्के कंपन्या पहिल्या दिवसापासून उत्पादन सुरू करणार आहेत. अशा परिस्थितीत २३ कंपन्या हे काम लवकरात लवकर करतील. उर्वरित चार कंपन्या येत्या ९० दिवसांत या योजनेंतर्गत उत्पादन सुरू करतील. अश्विनी वैष्णव यांनी आशा व्यक्त केली की, या गुंतवणुकीतून एकूण ५० हजार लोकांना थेट रोजगार मिळणार आहे. एकूण १.५० लाख लोकांना अप्रत्यक्षपणे रोजगार मिळणे अपेक्षित आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, देशात आयटी हार्डवेअरच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने उत्पादन-लिंक्ड प्रोत्साहन योजना २.० सुरू केली आहे. याद्वारे सरकार देशात आयटी हार्डवेअरच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि या क्षेत्रात नवे रोजगार निर्माण करण्यासाठी १७ हजार कोटी रुपये खर्च करेल.