किमान तापमान : 29.17° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 4.78 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.34°से. - 30.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– अफवा आणि तथ्य,
नवी दिल्ली, (१९ नोव्हेंबर) – जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकन रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र (सीडीसी) यांनी प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, २०२२ साली भारतातील सुमारे ११ लाख बालकांनी गोवर लसीचा पहिला डोस चुकवला असल्याचे वृत्त काही प्रसार माध्यमातून प्रसिद्ध झाले आहे.
हे अहवाल वस्तुस्थितीवर आधारित नाहीत आणि खरे चित्रसुद्धा दर्शवत नाहीत. हे अहवाल डब्ल्यूएचओ यूएनआयसीइएफ राष्ट्रीय लसीकरण मोहित व्याप्तीचा अंदाज (डब्ल्यूयूइएनआयसी) २०२२ च्या अहवालानुसार नोंदवलेल्या अनुमानित संख्येवर आधारित आहेत, ज्यात १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ हा कालावधी विचारात घेतला आहे.
मात्र, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानुसार, पात्र २,६३,८४,५८० बालकांपैकी एकूण २,६३,६३,२७० बालकांनी आर्थिक वर्ष २०२२ मध्ये गोवर लसीचा पहिला डोस घेतला. तसेच (एप्रिल २०२२ ते मार्च २०२३) मध्ये फक्त २१,३१० बालकांनी गोवर लसीचा पहिला डोस चुकवला.
याशिवाय, लसीकरण न केलेल्या किंवा काही प्रमाणात लसीकरण झालेल्या सर्व बालकांना गोवर युक्त लसीचे (एमसीव्ही) चुकवलेले डोस मिळतील याची खातरजमा करण्यासाठी भारत सरकारने राज्यांच्या समन्वयाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत:
a गोवर लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी विशिष्ट कालावधीकरता लस देण्याचे वय २ वर्षांवरून ५ वर्षांपर्यंत वाढविण्यात आले आहे.
a लसीकरण न झालेल्या/ काही प्रमाणात लसीकरण झालेल्या सर्व बालकांसाठी लसीकरणाचे डोस चुकवल्यामुळे २०२१ आणि २०२२ साली मोहीम इंद्रधनुष, (आयएमआय) ३.० आणि ४.० राबविण्यात आले. याशिवाय, २०२३ साली ५ वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये एमआर लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठी विशेष लक्ष केंद्रीत करून आयएमआय ५.० आयोजित करण्यात आले.
a दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये एमआर लसीकरण मोहीम राबविण्यात आली, ज्यामध्ये पश्चिम बंगालमधील ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना (दिल्लीमध्ये ९ महिने ते ५ वर्षे) वयोगटातील मुलांना एमआर लसीचा डोस देण्यात आला. यामुळे दोन्ही राज्यांची लसीकरणाची व्याप्ती तब्बल ९५% पर्यंत पोहोचली.
a अनेक राज्यांनी पूरक लसीकरण उपक्रम राबविले, त्यांना उदंड प्रतिसाद मिळाला, त्याअंतर्गत एकूण ३० दशलक्ष मुलांना एमआर लसीचा अतिरिक्त डोस देऊन लसीकरण करण्यात आले.
थ् प्रसार प्रतिसाद लसीकरणाबाबत एक विशेष सूचना नोव्हेंबर २०२२ मध्ये सामायिक करण्यात आली होती, ज्यात स्पष्टपणे नमूद केले होते की जेथे ९ महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बालकांमध्ये गोवरची प्रकरणे १०% पेक्षा जास्त असतील तर एमआरसीव्ही’चा एक डोस ६ महिने ते ९ महिने वयोगटातील सर्व बालकांना द्यावा लागेल. त्याचबरोबर गोवरचे सर्व डोस कोणत्याही मुलाला चुकवू नये.
a गोवर नसलेला (नॉन रुबेला) (एनएमएनआर) लस देण्याचा दर ५.८% इतका आहे, जो चालू आर्थिक वर्षातला आतापर्यंतचा उच्चांक आहे. त्यावरून देखरेख करणारी यंत्रणा सक्षम असल्याचे दिसून येते.
सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमांतर्गत देशातील प्रत्येक बालकाचे लसीकरण केले जाईल याची खात्री करण्याच्या भारताच्या अखंड वचनबद्धतेला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे. अमेरिकन रेडक्रॉस, बीएमजीएफ, जीएव्हीआय, यूएस सीडीसी, युनीसेफ आणि जागतिक आरोग्य संघटना अशा बहु-संस्था नियोजन समितीच्या गोवर आणि रुबेला विषयक भागीदारीच्या माध्यमातून प्रादेशिक गोवर आणि रुबेला कार्यक्रमात भारताचे अनुकरणीय नेतृत्व आणि प्रेरणा यांची प्रशंसा केली गेली आहे आणि त्याला जागतिक मान्यता मिळाली आहे. भारताच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाला मार्च २०२४ मध्ये वॉशिंग्टन डीसी येथे गोवर आणि रुबेला भागीदारी चॅम्पियन पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.