किमान तापमान : 28.99° से.
कमाल तापमान : 29.43° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 1.77 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
27.71°से. - 29.3°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.9°से. - 30.84°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.76°से. - 30.97°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.93°से. - 30.63°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.46°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल26.12°से. - 29.61°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाशदगडफेकीच्या घटनांमध्ये ८८ टक्क्यांची घट, गृहमंत्रालयाची माहिती,
नवी दिल्ली, ४ ऑगस्ट – जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० निष्प्रभ करण्यात आल्यानंतर मागील दोन वर्षांच्या काळात जम्मू-काश्मिरात दहशतवादी कारवाया आणि अतिरेकीविरोधी मोहिमेच्या काळातील दगडफेकीच्या घटनांमध्ये मोठी घट झाल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे.
विशेषत: २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये दगडफेकीच्या घटनांमध्ये ८८ टक्क्यांनी कमी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २०१९ च्या जानेवारी ते जुलै या काळात दगडफेकीच्या एकूण घटनांच्या तुलनेत २०२० मध्ये ८८ टक्क्यांनी घट झाली आहे. याशिवाय, अतिरेकी कारवाया आणि अन्य हिंसाचारात जखमी किवा मृत होणार्या जवान आणि नागरिकांची संख्या ९३ टक्क्यांवरून कमी होत ८४ टक्क्यांवर आली आहे.
२०१९ च्या जानेवारी ते जुलै या काळात दगडफेकीच्या एकूण ६१८ घटना घडल्या होत्या. २०२० मध्ये याच कालावधीत केवळ २२२ घटना घडल्या आहेत. चालू वर्षात हा आकडा फक्त ७६ इतका आहे. २०१९ मध्ये सुरक्षा दलांचे ६४ जवान जखमी झाले होते, तर यावर्षी फक्त १० जवान जखमी झाले. याशिवाय पॅलेट गनचा वापर आणि लाठीमाराच्या घटनांमध्ये जखमी झालेल्या नागरिकांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. २०१९ मध्ये अशा घटनांमध्ये ३३९ नागरिक जखमी झाले होते. तर यावर्षी हा आकडा २५ इतका आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटनांमध्ये घट होण्याचे मुख्य कारण म्हणजे, सरकारकडून लादण्यात आलेले कोरोना निर्बंध होय. यामुळे माथेफिरूंना एकत्र येण्यावर निर्बंध आहेत.
विकासासाठी प्रचंड निधी
नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी स्वत: पुढाकार घेत केंद्राच्या विकासाच्या योजना राज्यातील जनतेपर्यंत कशा पोहोचतील, याकडे विशेष लक्ष दिले. काश्मिरी जनतेला देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोदी सरकार शक्य त्या सर्व उपाययोनजा करीत आहे. आतापर्यंत हजारो कोटींचा निधी विकास कामांसाठी सरकारने उपलब्ध करून दिला आहे. तसेच पर्यटन, शिक्षण व औद्योगिक विकासासाठी भरीव पॅकेजही सरकारने घोषित केले आहे. प
कलम ३७० निष्प्रभ करण्याला दोन वर्षे पूर्ण
जम्मू-काश्मिरातील कलम ३७० निष्प्रभ करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाला उद्या गुरुवारी दोन वर्षे पूर्ण होणार आहेत. कथित सेक्युलर व मुस्लिम धार्जिणे पक्ष व संघटनांच्या विरोधाची मुळीच पर्वा न करता केंद्राने हे अभूतपूर्व पाऊल उचलून आपल्या कणखरतेचा परिचय दिला. हा निर्णय घेतल्यानंतर जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले.