|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:34 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 29.81° से.

कमाल तापमान : 29.93° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 54 %

वायू वेग : 4.76 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

29.93° से.

हवामानाचा अंदाज

27.3°से. - 30°से.

रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा
हवामानाचा अंदाज

27.85°से. - 31.56°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.12°से. - 31.57°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.41°से. - 30.38°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.74°से. - 30.38°से.

गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.37°से. - 29.74°से.

शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल
Home » नागरी, राष्ट्रीय » १२ ते १८ वयोगटातील लसीकरण लवकरच

१२ ते १८ वयोगटातील लसीकरण लवकरच

नवी दिल्ली, ४ ऑगस्ट – झायडस कॅडिलाच्या लसीला आपात्कालीन वापरासाठी दोन आठवड्यांत मंजुरी मिळू शकते. ही लस १२ ते १८ वर्षांच्या मुलांसाठी ६७ टक्क्यांपर्यंत परिणामकारक आहे. या लसीची १२ वर्षांहून अधिक वयाच्या मुलांवर चाचणी झाली आहे. आता लवकरच या लसीला भारतीय औषध महानियंत्रकांची (डीसीजीआय) परवानगी मिळण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती नीती आयोगाचे आरोग्य सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली.
झायडस कॅडिलाच्या झायकोव्ह-डी या कोरोना लसीची तिसर्‍या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली आहे. कॅडिलाने या लसीसाठी सीडीएससीओ म्हणजेच, केंद्रीय औषध दर्जा नियंत्रण संस्थेकडे आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मागितली आहे. कंपनीने जवळपास २८ हजार जणांवर चाचणी पूर्ण केल्यानंतर आपात्कालीन वापराच्या मंजुरीसाठी अर्ज केला आहे. कंपनीच्या अर्जावर सीडीएससीओकडून माहिती विश्‍लेषण केले जात आहे. कंपनीने लसीच्या चाचणीचा सर्व डेटा देण्यात आला आहे.
या लसीची १२ ते १८ वर्षांच्या जवळपास हजार मुलांवर चाचणी घेण्यात आली. ही लस सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा प्रभाव ६६.६० टक्के आहे. तीन मात्रा असलेली ही लस ४ आठवड्यांच्या अंतराने दिली जाऊ शकते. या लसीची २-८ अंश तापमानावर साठवणूक केली जाऊ शकते. ही पहिली डीएनएआधारित लस आहे. यात इंजेक्शनचा वापर केला जात नाही, तर ही लस नीडल फ्री आहे. ही लस जेट इंजेक्टरमार्फत देण्यात येईल.
कोरोनाची दुसरी लाट ओसरलेली नाही: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा इशारा
नियमांचे काटेकोर पालन करण्याचा सल्ला
कोरोनाची दुसरी लाट ओसरलेली नाही. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे, असा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. महाराष्ट्र, आंध्रप्रदेशातील बाधितांची संख्या कमी झाली असली, तरी केरळमधील बाधितांची वाढती संख्या चिंता वाढवणारी आहे.
देशात कोरोनाचा धोका कायम आहे. दुसरी लाट अजून संपलेली नाही. ८ राज्यांमध्ये धोका कायम आहे. केवळ महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश या दोन राज्यांमध्ये याची चिंता कमी झाली आहे. देशातील एकूण ४४ जिल्ह्यांत सक्रिय बाधितांचा दर १० टक्क्यांपेक्षा अधिक असून, ५७ जिल्ह्यांत दररोज १०० नवीन बाधित आढळत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी धारावीने कोरोनाच्या दुसर्‍या लाटेवर नियंत्रण मिळवले आहे. मुंबईतील धारावीत कोरोनाचा सातव्यांदा एकही बाधित आढळला नाही. मुंबई महापालिकेकडून कोरोना चाचण्या आणि लसीकरणावर भर देण्यात येत असल्याने हे शक्य झाले आहे. मात्र, महाराष्ट्राला झिकाचा धोका वाढला आहे. केंद्रीय पथक पुण्यात दाखल झाले असून विविध विभागांच्या अधिकार्‍यांशी चर्चा करणार आहे. हे पथक बेलसर गावालाही भेट देणार आहे. बेलसरजवळच्या सहा गावांतील रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येणार आहेत.
नव्या बाधितांमध्ये केरळने वाढवली चिंता
देशभरात मागील चोवीस तासांत ४२,६२५ नव्या बाधितांची भर पडली असून, यात केरळचा वाटा २३,६७६ इतका आहे. देशाच्या विविध भागांमध्ये कोरोनाची लाट ओसरत असताना, केरळने मात्र देशाची चिंता वाढवली आहे. सक्रिय बाधितांच्या संख्येतही वाढ झाल्याचे दिसून आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज बुधवारी याबाबतची माहिती जाहीर केली.
ऋ ४२,६२५ नव्या बाधितांमुळे देशातील एकूण संक्रमितांचा आकडा ३ कोटी १७ लाख ६९ हजारांवर पोहोचला.
ऋ ३६,६६८ जणांनी कोरोनावर मात केल्याने, आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या ३.०९ कोटींवर गेलीे.
ऋ ५६२ जणांचा मृत्यू झाल्याने, कोरोनाबळींचा आकडा ४.१० लाखांवर पोहोचला आहे.
ऋ देशभरात सध्या ४.१० लाखांवर सक्रिय बाधित आहेत. बरे होण्याचे प्रमाण कमी झाले.
ऋ मंगळवारी दिवसभरात १८.४७ लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत झालेल्या चाचण्यांची संख्या यामुळे ४७.३१ कोटींवर गेली. तिथेच, देशव्यापी लसीकरणात आतापर्यंत ४८.५२ कोटी लोकांना लस टोचण्यात आली आहे.

Posted by : | on : 5 Aug 2021
Filed under : नागरी, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g