किमान तापमान : 26.99° से.
कमाल तापमान : 27.77° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 3.37 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
26.99°से. - 29.9°से.
रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा27.47°से. - 31.24°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.29°से. - 31.41°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.45°से. - 30.88°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.91°से. - 30.52°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.48°से. - 30.03°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाशराज्यसभेत गोंधळ घालणे महागात पडले,
नवी दिल्ली, ४ ऑगस्ट – पेगासस हेरगिरी प्रकरण तसेच कृषी कायद्याच्या मुद्यावर आजही राज्यसभेत गदारोळ झाला, यामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले. गोंधळ घालणार्या तृणमूल कॉंग्रेसच्या सहा सदस्यांना दिवसभरासाठी निलंबित करण्यात आले.
आज सकाळी सभागृहाच्या कामकाजाला प्रारंभ होताच अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी सर्व स्थगन प्रस्ताव फेटाळल्याची माहिती दिली. यामुळे संतप्त झालेल्या कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस तसेच अन्य विरोधी पक्षांच्या सदस्यांनी वेलमध्ये धाव घेत घोषणाबाजी केली. या सदस्याच्या हातात घोषणांचे पोस्टर्स होते. पेगासस मुद्यावर तातडीने चर्चा घेण्याची विरोधकांची मागणी होती.
सदस्यांनी शांत राहण्याचे तसेच आपल्या जागेवर जात सभागृहाचे कामकाज सुरळीत चालू देण्याचे आवाहन नायडू करत होते. मात्र, सदस्य त्याला प्रतिसाद देत नव्हते. हातात पोस्टर्स घेऊन वेलमध्ये येत घोषणाबाजी करणार्या सदस्यांची नावे नियम २५५ नुसार प्रकाशित केली जातील, तसेच त्यांना निलंबित केले जाईल, असा इशारा नायडू यांनी दिला. मात्र, या इशार्याकडे दुर्लक्ष करत विरोधकांची घोषणाबाजी सुरूच होती.
नायडू यांनी गोंधळ घालणार्या कोणत्याही सदस्यांचे नाव घेतले नाही, मात्र गोंधळ घालणार्या सदस्यांनी सभागृहाबाहेर निघून जावे, असे म्हटले. राज्यसभा सचिवालयाने गोंधळ घालणार्या सदस्यांची नावे द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. मोहम्मद नदीमूल हक, अबीररंजन विश्वास, डोला सेन, अर्पिता घोष, मोसम नूर आणि शांता छेत्री या तृणमूल कॉंग्रेसच्या सहा सदस्यांना दिवसभरासाठी निलंबित करण्यात आल्याचे सांसदीय बुलेटिनमध्ये म्हटले.
हे सदस्य हातात पोस्टर्स घेऊन सभापतींच्या आसनाजवळ आले, त्यांनी अध्यक्षांच्या आदेशांचे पालन केले नाही. आज सकाळची त्यांची वागणूक अनुचित होती, त्यामुळे नियम २५५ नुसार त्यांचे सदस्यत्व दिवसभरासाठी निलंबित करण्यात येत आहे, असे या बुलेटनटिनमध्ये म्हटले.