किमान तापमान : 28.07° C
कमाल तापमान : 28.99° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 84 %
वायू वेग : 2.31 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.99° C
28.03°C - 31.7°C
sky is clear28.31°C - 30.4°C
sky is clear28.05°C - 30.2°C
sky is clear27.73°C - 30.04°C
sky is clear27.81°C - 29.81°C
few clouds27.73°C - 29.97°C
sky is clearकुलगाम, (३ फेब्रुवारी ) – सुरक्षा दलांनी शुक्रवारी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आणि कुलगाम जिल्ह्यातील मिरहामा गावातून सहा दहशतवाद्यांना अटक केली. दहशतवाद्यांच्या अड्ड्यातून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
कुलगाम पोलिसांना या परिसरात दहशतवाद्यांची उपस्थिती असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने तातडीने शोध मोहीम सुरू केली. यादरम्यान सुरक्षा दलांना दहशतवादी लपण्याचे ठिकाण सापडले, तेथून सहा दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. सूत्रांनुसार, घटनास्थळावरून चार युबीजीएल ग्रेनेड, ४४६ गोळ्या, ३० एके ४७, दोन मोर्टार शेल आणि इतर आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. दहशतवाद्यांची चौकशी केली जात असून भविष्यात आणखी अटक आणि जप्तीची शक्यता नाकारता येत नाही.