किमान तापमान : 27.99° से.
कमाल तापमान : 28.18° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 3.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.97°से. - 30.14°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.06°से. - 30.88°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.63°से. - 31.01°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.09°से. - 29.92°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.35°से. - 30.07°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.17°से. - 29.52°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (३ फेब्रुवारी ) – स्वीडन आणि डेन्मार्कमधून गेल्या महिन्यात कुराण जाळण्याच्या आणि फाडल्याच्या बातम्या समोर आल्या. आता नॉर्वेमध्ये अशाच इस्लामविरोधी निदर्शनात कुराण जाळण्याची तयारी सुरू होती, ती तुर्कीच्या मदतीने थांबवण्यात आली आहे. दरम्यान, इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स च्या प्रमुखाने म्हटले आहे की, कुराण जाळणार्यांना मुस्लिम कधीही सोडणार नाहीत. स्वीडन आणि डेन्मार्कमधील घटनांपासून प्रेरित होऊन काही इस्लामविरोधी लोक या आठवड्यात शुक्रवारी नॉर्वेमध्ये कुराण जाळणार होते. तुर्कस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने नॉर्वेच्या राजदूताला सुगावा लागताच तक्रार करण्यासाठी बोलावले, त्यानंतर काही तासांनी इस्लामिक विरोधी निदर्शनांवर गुरुवारी बंदी घालण्यात आली.
वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की, आंदोलकांच्या एका गटाने शुक्रवारी ओस्लो येथील तुर्की दूतावासाबाहेर कुराणाची प्रत जाळण्याची योजना आखली होती. ते म्हणाले, ‘कुराण जाळणे हा नॉर्वेमध्ये राजकीय विचार व्यक्त करण्याचा कायदेशीर मार्ग आहे.’ मात्र सुरक्षेच्या कारणास्तव हे प्रदर्शन थांबवण्यात आले आहे. नॉर्वेमध्ये इस्लामविरोधी लोकांनी कुराण जाळण्याच्या योजनेचा गुरुवारी तुर्कस्तानने तीव्र निषेध केला. तुर्कीने हे पाऊल चिथावणीखोर म्हटले आहे. तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयातील एका सूत्राने सांगितले की, मंत्रालयाने निदर्शन थांबवण्यास सांगितले होते. नॉर्वेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘आमच्या राजदूताने नॉर्वेमधील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या घटनात्मक अधिकाराचा उल्लेख केला जेव्हा तुर्कीने बोलावले होते आणि नॉर्वेजियन सरकार नियोजित निदर्शनास समर्थन देत नाही किंवा सहभागी होत नाही. लोकांना धोका असेल तेव्हाच पोलिस निदर्शनास बंदी घालू शकतात.
‘कुराण जाळणार्यांना मुस्लिम सोडणार नाहीत’
इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स चे प्रमुख मेजर जनरल होसेन सलामी यांनी गुरुवारी युरोपमध्ये कुराणच्या अपमानाच्या या घटनांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. कुराणाचा अपमान करणार्यांना शिक्षेची धमकी दिली. इराणची अधिकृत वृत्तसंस्था आयआरएनए ने मेजरच्या हवाल्याने म्हटले आहे की, ‘आज आम्ही इस्लाम आणि कुराणचे संरक्षक आहोत… जे कुराण जाळत आहेत, त्यांना आम्ही सांगू इच्छितो की हीच आग एक दिवस तुमच्या शरीराला पकडेल. आणि तुम्ही एक प्रेत बनाल. आजपासून तुम्ही सर्वजण सुरक्षित राहा, आणि दररोज रात्री भयानक स्वप्ने पहा, जरी दशके उलटली तरी मुस्लिम तुम्हाला सोडणार नाहीत.’