किमान तापमान : 27.25° से.
कमाल तापमान : 27.77° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 3.37 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.25° से.
26.99°से. - 29.9°से.
रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा27.47°से. - 31.24°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.29°से. - 31.41°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.45°से. - 30.88°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.91°से. - 30.52°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.48°से. - 30.03°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (३ फेब्रुवारी ) – शारदा मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्या पत्नी नलिनी चिदंबरम, सीपीएमचे माजी आमदार देबेंद्रनाथ बिस्वास आणि इतर लाभार्थ्यांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने शुक्रवारी सांगितले की, नलिनी चिदंबरम, माजी सीपीएम आमदार देबेंद्रनाथ बिस्वास आणि आसामचे माजी मंत्री अंजन दत्ता यांच्या कंपन्यांची एकूण ६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
केंद्रीय तपास एजन्सीने एका निवेदनात म्हटले आहे की, मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा अंतर्गत ३.३० कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि ३ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त करण्याचा तात्पुरता आदेश जारी करण्यात आला आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरण २०१३ पर्यंत पश्चिम बंगाल, आसाम आणि ओडिशामध्ये शारदा समूहाने केलेल्या कथित चिटफंड घोटाळ्याशी संबंधित आहे. ईडीने सांगितले की, या समूह कंपनीने उभारलेली एकूण रक्कम सुमारे २,४५९ कोटी रुपये आहे, ज्यापैकी सुमारे १,९८३ कोटी रुपये अजूनही ठेवीदारांकडे आहेत. या प्रकरणी ईडीने आतापर्यंत सुमारे ६०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.