किमान तापमान : 28.54° से.
कमाल तापमान : 29.63° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 2.05 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.54° से.
27.37°से. - 29.77°से.
रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा27.47°से. - 31.24°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.29°से. - 31.41°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.45°से. - 30.88°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.91°से. - 30.52°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.48°से. - 30.03°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश– उत्तरप्रदेश, कर्नाटकमध्ये उत्पादनात वाढ,
नवी दिल्ली, (३ फेब्रुवारी ) – देशात साखरेच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. केंद्र सरकारने साखर उत्पादनाबाबतची आकडेवारी नुकतीच जाहीर केली. साखर उत्पादनात महाराष्ट्राचा पहिला क‘मांक आहे. त्याबरोबरच उत्तर प्रदेश, कर्नाटक राज्यातही साखरेचे उत्पादन वाढले आहे. सध्या देशात मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याचे उत्पादन झाले आहे. अशातच साखरेच्या उत्पादनातही मोठी वाढ झाली आहे. केंद्र सरकारने साखर उत्पादनाबाबतची आकडेवारी नुकतीच जाहीर केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी साखरेच्या उत्पादनात ६ लाख टनांनी वृद्धी झाली आहे. यावर्षी साखरेचे उत्पादन १८७ लाख टनांवरून १९३ लाख टन झाले आहे.
आतापर्यंत साखर उत्पादनाची स्थिती कायम असल्याचे जाणकारांनी सांगितले आहे. त्यामुळे पुढील काळात साखरेचे दर कमी होऊ शकतात. सणासुदीच्या काळात नागरिकांना याचा निश्चितच लाभ होईल. इंडियन शुगर मिल असोसिएशनची आकडेवारी समोर आली आहे. त्यांच्या मते, गेल्या ४ महिन्यांत साखरेचे उत्पादन ३.४२ टक्क्यांनी वाढून १९३.५ लाख टन झाले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत साखरेचे उत्पादन १८७.१ लाख टन होते.
उत्तरप्रदेश, कर्नाटकमध्ये उत्पादनात वाढ
देशातील प्रमुख साखर उत्पादक राज्यांमध्ये वाढ नोंदवली जात आहे. साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात अव्वल आहे. दुसर्या क‘मांकावर उत्तरप्रदेश व तिसर्या क‘मांकावर कर्नाटक आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर-जानेवारीमध्ये महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन ७२.९ लाख टन होते, ते यावर्षी ७३.०८ लाख टन झाले आहे. त्याचवेळी, उत्तरप्रदेशात गेल्या वर्षी ५०.३ लाख टन होते. ते आता ५१ लाख टन झाले आहे. याच कालावधीत कर्नाटकात साखरेचे उत्पादन ३८.०८ लाख टन होते. यावर्षी ३९.४ लाख टन झाले आहे. इतर राज्यांतील साखर उत्पादनाची स्थिती पाहिल्यास सुमारे ४ लाख टनांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
गेल्या वर्षीच्या साखर गळीत हंगामात ५१० साखर कारखान्यांनी उसाचे गाळप केले होते. मात्र, यावर्षी ३१ जानेवारीपर्यंत ५२० साखर कारखान्यांचे गाळप सुरू आहे. इथेनॉल निर्मितीसाठी पाठवलेला मोलॅसेस एकूण साखर उत्पादनापेक्षा वेगळा असतो. गेल्या वर्षी ते १८७.१ लाख टन होते. मात्र, भारत सरकार इथेनॉल निर्मितीवर अधिक भर देत असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.