किमान तापमान : 23.23° से.
कमाल तापमान : 23.72° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 64 %
वायू वेग : 3.28 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.23° से.
22.99°से. - 24.74°से.
रविवार, 12 जानेवारी घनघोर बादल22.18°से. - 25.29°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.33°से. - 26.94°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.75°से. - 25.03°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.78°से. - 25.26°से.
गुरुवार, 16 जानेवारी साफ आकाश24.45°से. - 26.41°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्पष्ट संदेश,
द्रास, (२६ जुन) – आपले अस्तित्व टिकविण्यासाठी पाकिस्तान दहशतवाद आणि छुप्या युद्धाचा वापर करीत आहे. तुमचा हा दहशतवाद आमचे जवान पूर्ण शक्तिनिशी चिरडून टाकणार आहेत, असा स्पष्ट आणि कठोर संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार पाकिस्तानला दिला. कारगिल विजय दिनानिमित्त लडाखच्या द्रास येथे आयोजित कार्यक्रमाला ते संबोधित होते. १९९९ मधील कारगिल युद्धात आमच्या शूर जवानांनी पाकी सैनिक आणि अतिरेक्यांना गुडघ्यावर आणले होते.
या देशाने भूतकाळातून अजूनही कोणताच धडा घेतलेला नाही. आज मी जिथून हा संदेश देत आहे, तिथून दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना तो स्पष्टपणे ऐकू जाईल. दहशतवाद्यांना आश्रय देणार्यांना मी सांगू इच्छितो की, त्यांच्या भारतविरोधी कारवाया कधीच यशस्वी होणार नाही, असे मोदी यांनी लष्करातील वरिष्ठ अधिकार्यांच्या उपस्थितीत सांगितले. आजपर्यंतच्या प्रत्येक युद्धात पाकिस्तानने पराभवाचाच स्वाद चखलेला आहे. वारंवार पराभूत होऊनही या देशाने कुठलाच धडा घेतलेला नाही. दहशतवाद आणि छुप्या युद्धाच्या माध्यमातून या देशाच्या भारतविरोधी कारवाया अजूनही सुरूच आहेत. आमचे जवान त्यांचा प्रत्येक प्रयत्न उधळून लावतील आणि दहशतवाद ठेचून काढतील, असा स्पष्ट इशारा पंतप्रधान मोदी यांनी दिला.
कारगिल हुतात्म्यांना अभिवादन
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी कारगिल युद्धात वीरमरण आलेल्या जवानांना अभिवादन केले. २६ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी आपण केवळ युद्धच जिंकले नव्हते, तर सत्य, संयम आणि शक्तीचे आगळेवेगळे उदाहरण जगापुढे ठेवले, असे मोदी यांनी सांगितले.
जवानांना तंदुरुस्त ठेवण्यासाठीच अग्निवीर योजना
युद्धाच्या काळात सशस्त्र दलांमधील जवानांना नेहमीच तंदुरुस्त ठेवण्यासाठी अग्निवीर योजना लागू केली, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी या योजनेला विरोध करणार्या विरोधी पक्षांवर हल्ला चढविला. काही लोक राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असलेल्या या संवेदनशील मुद्यावर राजकारण करीत आहेत, असा आरोपही मोदी यांनी केला.