किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.47°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (१८ फेब्रुवारी) – भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांचा अध्यक्ष म्हणून कार्यकाळ जून २०२४ पर्यंत वाढवण्यात आला. नड्डा यांचा भाजपा अध्यक्ष म्हणून कार्यकाळ संपला होता. भाजपा राष्ट्रीय परिषदेच्या प्रगती मैदानस्थित भारतमंडपममध्ये सुरू असलेल्या द्विदिवसीय अधिवेशनात नड्डा यांच्या कार्यकाळाला आज जून २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. अध्यक्ष म्हणून पक्षाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा अधिकारही नड्डा यांना देण्यात आला. मात्र या निर्णयांवर नंतर भाजपा संसदीय मंडळाकडून त्यांना शिक्कामोर्तब करून घ्यावे लागणार आहे.
नड्डा यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढवण्यात आल्याची घोषणा मागील महिन्यातच करण्यात आली होेती, आज त्या निर्णयावर राष्ट्रीय परिषदेने औपचारिक शिक्कामोर्तब केले. नड्डा यांचा कार्यकाळ वाढवण्याची घोषणा करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी, नड्डा यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात आम्ही उत्तरप्रदेशात दुसर्यांदा विजय मिळवला, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये आमच्या जागा आणि मतांची टक्केवारी वाढली, महाराष्ट्रात रालोआने बहुमत मिळवत सरकार बनवले, तसेच गुजरातमध्ये लक्षणीय विजय मिळवल्याचे सांगितले होते. २०१९ मध्ये नड्डा यांची भाजपाचे कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. २०२० मध्ये त्यांची पक्षाचे नियमित अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. अमित शाह यांच्याकडूनच नड्डा यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. लोकसभा निवडणुका असल्यामुळे नड्डा यांच्या अध्यक्षपदाला मुदतवाढ देण्यात आली. जून २०२४ नंतर भाजपाला आपला नवीन अध्यक्ष निवडावा लागणार आहे.