किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (१३ जानेवारी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे मंत्री एल मुरुगन यांच्या घरी तामिळनाडूत पोंगल साजरा करणार आहेत. रविवार, १४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता मुरुगन यांचे शासकीय निवासस्थान १ कामराज लेन येथे पोंगल कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. गेल्या वर्षी तामिळ नववर्ष पुथांडू साजरे करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी एप्रिलमध्ये मुरुगन यांच्या घरीही भेट दिली होती. पुथंडू जगभरातील तमिळ लोक उत्साहाने साजरा करतात. तमिळ काशी संगमचे आयोजन पीएम मोदींच्या संसदीय मतदारसंघ वाराणसीमध्येही करण्यात आले आहे. नवीन संसद भवनात सेंगोलचीही स्थापना करण्यात आली आहे.
पंतप्रधानांनी अनेक प्रसंगी तमिळला जगातील सर्वात जुनी भाषा म्हणत तिचे कौतुक केले आहे. या वर्षाची सुरुवातही त्यांनी तामिळनाडू आणि लक्षद्वीपच्या दौर्याने केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने विशेषत: दक्षिण भारतावर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचवेळी पंतप्रधान मोदींनी नवीन वर्षाची सुरुवात दक्षिण भारताच्या दौर्याने केली. पंतप्रधान मोदींच्या यात्रेत तामिळनाडू, लक्षद्वीप आणि केरळच्या दौर्याचा समावेश आहे. २ आणि ३ जानेवारीला त्यांनी हा दौरा केला. २ जानेवारी रोजी ते तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे पोहोचले, जिथे त्यांनी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात भाग घेतला. यानंतर पंतप्रधान मोदींनी केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपमध्ये जाहीर सभेला संबोधित होते.