किमान तापमान : 28° से.
कमाल तापमान : 28.01° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 63 %
वायू वेग : 3.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28° से.
27.93°से. - 30.83°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर कुछ बादल27.32°से. - 30.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.51°से. - 29.25°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.1°से. - 29.82°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.89°से. - 29.89°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश26.01°से. - 29.34°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादल-समलिंगी विवाहाला केंद्राचा विरोध,
-दिला संयुक्त कुटुंब संस्कृतीचा हवाला,
नवी दिल्ली, (१३ मार्च) – देशात समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यात यावी, यासाठी दाखल अनेक याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे. मात्र, केंद्र सरकारने या मुद्यावर आपली भूमिका प्रतिज्ञापत्रातून सादर करीत, समलिंगी विवाहाच्या संकल्पनेलाच विरोध केला आहे. आपली भूमिका अधिक स्पष्ट करताना सरकारने देशातील संयुक्त कुटुंब संस्कृतीचा संदर्भ दिला. समलिंगी आणि विषमलिंगी संबंध हे दोन्ही वेगवेगळे घटक आहेत. त्यांना एकाच प्रकारात मांडता येणार नाही, असे केंद्राने शपथपत्रात स्पष्ट केले.
जोडीदार म्हणून सोबत राहणे आणि समलिंगी लोकांनी संबंध प्रस्थापित करणे हा प्रकार पती, पत्नी, मुले आणि घरातील ज्येष्ठ मंडळीचा समावेश असलेल्या संयुक्त कुटुंब संकल्पनेशी पूर्णपणे विपरित आहे. विवाह हा एक स्त्री आणि पुरुष यांच्यात होतो. त्यावेळी त्यांच्या नात्याला पती-पत्नी असे नाव दिले जाते. त्याच्या एकत्रिकरणातून मुले जन्माला येतात आणि या पती व पत्नीला आई-बाबा असे संबोधले जाते. दोन भिन्न लिंग असलेल्या व्यक्तींमधील विवाह कुटुंब पद्धतीसाठी आवश्यक असतो. विवाहाची जी सामाजिक, सांस्कृतिक आणि कायदेशीर संकल्पना आहे, ती हीच आहे. ती विस्कळीत होता कामा नये, असेही केंद्राने नमूद केले.