किमान तापमान : 27.99° से.
कमाल तापमान : 28.01° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 61 %
वायू वेग : 3.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.95°से. - 30.83°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर कुछ बादल27.32°से. - 30.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.51°से. - 29.25°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.09°से. - 29.82°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.89°से. - 29.89°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश26.01°से. - 29.34°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादल-कामकाज दिवसभरासाठी स्थगित,
नवी दिल्ली, (१३ मार्च) – राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केलेल्या भारतविरोधी विधानांचे संतप्त पडसाद सोमवारी राज्यसभेत उमटले, भाजपा सदस्य राहुल गांधींच्या माफीची मागणी करीत होते, तर काँग्रेस सदस्य अदानी मुद्दा उपस्थित करीत होते. या गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.
भोजनावकाशानंतर राज्यसभेच्या कामकाजाला प्रारंभ होताच अध्यक्ष जगदीप धनकड यांनी सभागृहाचे नेते पीयूष गोयल यांना बोलण्याची परवानगी दिली. एक ज्येष्ठ सदस्य विदेशात जाऊन भारतातील लोकशाही आणि अन्य घटनात्मक संस्थांचा अपमान करीत आहे, याबद्दल त्यांनी सभागृहाची आणि देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी गोयल यांनी केली. गोयल यांच्या विधानानंतर भाजपा सदस्यांनी माफी मागा, माफी मागा, अशा घोषणा दिल्या. दुसर्या सभागृहाचा सदस्य असलेल्याचा मुद्दा या सभागृहात उपस्थित करता येत नाही, असे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खडगे म्हणाले. सभागृहाचा सदस्य नसलेल्याबद्दल जे बोलण्यात आले, ते कामकाजातून वगळण्याची मागणी त्यांनी केली. आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ खडगे यांनी सभागृहातील दोन जुन्या घटनांचा संदर्भही दिला.
खडगे यांच्या या भूमिकेला काँग्रेसचे दिग्विजयसिंह तसेच भारत राष्ट्र समितीचे केशवराव यांनी समर्थन दिले. माझ्या ४७ वर्षांच्या राजकीय जीवनात मी असा प्रसंग कधी पाहिला नाही, सत्तापक्षाचे सदस्यच कामकाजात अडथळा आणत असल्याचा आरोप दिग्विजयसिंह यांनी केला. याचवेळी काँग्रेसचे शक्तिसिंह गोहिल आणि आपचे संजय सिंह यांच्यासह विरोधी सदस्य वेलमध्ये येत मोदी, अदानी अशा घोषणा देऊ लागले. दोन्ही बाजूच्या सदस्यांनी शांत राहावे, सभागृहाचे कामकाज चालू द्यावे, असे आवाहन धनकड करीत होते, पण त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. मी कोणाचेही नाव घेतले नाही, मग काँग्रेसचे सदस्य कशाबद्दल बोलत आहे, असे गोयल म्हणाले. सभागृहातील गोंधळ शांत होत नसल्यामुळे धनकड यांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले.
आज सकाळी राज्यसभेच्या कामकाजाला प्रारंभ होताच पीयूष गोयल यांनी विरोधी पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने परदेशात जाऊन सभागृहाचा अपमान केला. या सदस्याने आधीही लष्कर, न्यायालय, माध्यम आणि निवडणूक आयोगाबद्दल उलटसुलट विधाने केली, त्यामुळे त्यांनी सभागृहाची व देशाची माफी मागावी, अशी मागणी गोयल यांनी केली. आणिबाणीत लोकशाहीला गंभीर धोका निर्माण झाला होता, असे गोयल यांनी म्हणताच काँग्रेसचे सदस्य आक्रमक झाले. खडगे बोलायला उभे होताच भाजपा सदस्यांनी आपल्या जागेवर उभे होत माफी मागा, माफी मागा, अशी घोषणाबाजी केली. यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. जो सभागृहाचा सदस्य नाही, त्याच्यावर टिका करणे योग्य नाही, असे खडगे म्हणाले.