किमान तापमान : 27.99° से.
कमाल तापमान : 28.14° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 3.25 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.9°से. - 30.75°से.
रविवार, 17 नोव्हेंबर कुछ बादल27.29°से. - 30.38°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.62°से. - 29.87°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.06°से. - 29.89°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल26.05°से. - 29.46°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.8°से. - 29.31°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादलपरराष्ट्र मंत्रालयाचे वार्षिक अहवालात ताशेरे,
नवी दिल्ली, (१३ मार्च) – देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील कुटुंबीयांना न्याय देण्यात पाकिस्तानने आतापर्यंत प्रामाणिकपणा दाखवलेला नाही, असा ठपका परराष्ट्र मंत्रालयाने ठेवला आहे. मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या वार्षिक अहवालातून पाकिस्तानच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. २०२१-२२ च्या या व्यापक वार्षिक अहवालातून भारत पाकिस्तानसोबत सामान्य शेजार्याप्रमाणे संबंध ठेवू इच्छितो, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
भारत-पाकिस्तान दरम्यान कुठल्याही मुद्याला दहशतवाद तसेच हिंसाचारमुक्त वातावरणात द्विपक्षीय तसेच शांततापूर्ण पद्धतीने समाधान काढले पाहिजे, असे मत मंत्रालयाने अहवालातून व्यक्त केले आहे. पाकिस्तानी नेत्यांन त्यांच्या अंतर्गत राजकीय तसेच आर्थिक अपयशावरून लक्ष हटवण्यासाठी त्यांच्या देशांतर्गत प्रकरणांसह भारताविरोधात द्वेषपूर्ण वक्तव्यात कुठलीही घट झाल्याचे दिसून आले नाही, असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
सीमेपलीकडील दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी पाकिस्तानला विश्वसनीय, अपरिवर्तनीय आणि सत्यापित योग्य कारवाई करणे आवश्यक आहे. पाकिस्तानसोबत सामान्य शेजार्यांप्रमाणे संबंध ठेवण्याच्या भारताच्या प्रयत्नांना पाकिस्तानकडून सीमेपलीकडील दहशतवाद तसेच भारतविरोधात हिंसेच्या वारंवार समर्थनामुळे कमकुवत केले आहे, असे या अहवालात म्हटले आहे.