किमान तापमान : 23.23° से.
कमाल तापमान : 23.72° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 64 %
वायू वेग : 3.28 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.23° से.
22.99°से. - 24.74°से.
रविवार, 12 जानेवारी घनघोर बादल22.18°से. - 25.29°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.33°से. - 26.94°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.75°से. - 25.03°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.78°से. - 25.26°से.
गुरुवार, 16 जानेवारी साफ आकाश24.45°से. - 26.41°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (०४ जानेवारी) – पाकिस्तानला लागून असलेल्या पश्चिम सीमेवर भारत स्वदेशी ड्रोनविरोधी यंत्रणा बसवण्याच्या तयारीत आहे. शस्त्रास्त्रे आणि अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी पाकिस्तान दीर्घ काळापासून ड्रोनचा वापर करत आहे. हे थांबवण्यासाठी भारत येत्या सहा महिन्यांत पश्चिम सीमेवर ड्रोनविरोधी यंत्रणा बसवणार आहे. भारत या ड्रोनविरोधी प्रणालीसाठी तीन प्रकारच्या तंत्रज्ञानाची चाचणी घेत आहे. चाचणी केल्यानंतर, या तीनपैकी एक तंत्रज्ञान निवडले जाईल किंवा तिन्हींचे संयोजन केले जाईल.
पाकिस्तानकडून पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये ड्रोनद्वारे शस्त्रे, दारुगोळा आणि मादकपदार्थ सोडणे ही सुरक्षा यंत्रणांसाठी अनेक वर्षांपासून मोठी समस्या आहे. अँटी ड्रोन सिस्टिम हे तंत्रज्ञान आहे ज्याचा वापर मानवरहित हवाई उपकरणे (अनामरहित हवाई उपकरणे) जॅम करण्यासाठी केला जातो. ड्रोनमध्ये वेगवेगळ्या क्षमता असतात, ज्यावर ते ऑपरेट करतात. हे तंत्रज्ञान रेडिओ फि‘क्वेन्सीद्वारे ड्रोन ओळखते. हवेत कोणतीही संशयास्पद वस्तू दिसताच अँटी ड्रोन यंत्रणा ती नष्ट करते. भारताकडे ड्रोन डिटेक्टर, डिटर आणि डिस्ट्रॉय सिस्टिम म्हणजेच डी४ ड्रोन आहे. ही पहिली स्वदेशी ड्रोनविरोधी यंत्रणा आहे, जी डीआरडीओने तीन वर्षांत विकसित केली आहे.