किमान तापमान : 25.41° से.
कमाल तापमान : 26.46° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 8.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.46° से.
23.58°से. - 26.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 27.04°से.
शनिवार, 25 जानेवारी टूटे हुए बादल25.05°से. - 27.61°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.42°से. - 28.19°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.75°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.13°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, १८ मार्च – विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्ली येथे भेट घेतली आहे. यावेळी मनसुख हिरेन प्रकरणातील शिवसेनेच्या दोन नेत्यांची नावे गृहमंत्र्यांना देण्यात आली असून, त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी फडणवीस यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचे काही खासदार व वरिष्ठ नेत्यांचीही दिल्ली येथे भेट घेतली. या भेटीच्या वेळी मनसुख हिरेन हत्या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास संस्थेमार्फत करण्यासंदर्भात मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. फडणवीस आणि शाह यांच्यात यानंतर वेगळी बैठक झाली. ठाकरे सरकारने वाझे यांना निलंबित केले असले, तरी या सगळ्या कारस्थानामागील चेहरा समोर यायला हवा, अशी भूमिका फडणवीस यांनी घेतली आहे.
वाझे यांचे शिवसेनेसोबत राजकीयच नव्हे, तर व्यावसायिक संबंध देखील होते. त्यामुळे या प्रकरणांची चौकशी सखोल व्हायला हवी अशी भूमिका त्यांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.