|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:18 पी एम
हवामान

किमान तापमान : 25.97° से.

कमाल तापमान : 27.32° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 41 %

वायू वेग : 9.47 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

27.32° से.

हवामानाचा अंदाज

23.58°से. - 27.99°से.

शुक्रवार, 24 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

23.33°से. - 26.99°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.57°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.47°से. - 27.72°से.

सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.64°से.

मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.05°से. - 27.04°से.

बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल
Home » नागरी, राष्ट्रीय » महिना ५५ रुपये जमा करा व तीन हजार पेन्शन मिळवा

महिना ५५ रुपये जमा करा व तीन हजार पेन्शन मिळवा

मोदी सरकारची अभिनव योजना, असंघटित कामगारांवर लक्ष केंद्रित,
नवी दिल्ली, १८ मार्च – जर आपले मासिक उत्पन्न १५ हजार रुपयांपेक्षा कमी असेल आणि आपले वय जर ४० वर्षांपेक्षा कमी असेल, तर आपण मोदी सरकारच्या ‘प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजने’शी जुळून वृद्धापकाळात दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन अर्थात् निवृत्ती वेतन मिळवू शकता. केंद्रातील मोदी सरकारची ही योजना असंघटित क्षेत्रातील कामगार/मजुरांसाठी आहे.
केंद्र सरकारने या योजनेची सुरुवात वर्ष २०१९ मध्येच केली होती. पुढील पाच वर्षांमध्ये असंघटित क्षेत्रातील कमीत कमी १० कोटी श्रमिक आणि कामगरांना या योजनेचा लाभ मिळावा हे सरकारचे लक्ष्य आहे. केंद्र सरकारची हमी देणारी ही पेन्शन योजना आहे. याच्याशी जुळून आपण ६० वर्षांनंतर दर महिन्याला तीन हजार रुपयांपर्यंत पेन्शन प्राप्त करू शकता.
वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षा देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत जितकी रक्कम आपण दर महिन्याला जमा कराल तेवढीच रक्कम सरकार दर महिन्याला जमा करेल. या योजनेशी जुळण्यासाठी मासिक उत्पन्न १५ हजार रुपयांपेक्षा अधिक नको. जर आपले मासिक उत्पन्न १५ हजारांपेक्षा अधिक असेल, तर आपण या योजनेचा लाभ मिळवू शकत नाहीत.
कोण होऊ शकतो योजनेचा भाग?
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेत कुठलाही भारतीय नागरिक सहभागी होऊ शकतो. मात्र, त्याचे वय १८ ते ४० च्या दरम्यान असणे आवश्यक आहे. ही योजना घरकामगार, मोलकरणी, चांभार, शिंपी, रिक्षाचालक, धोबी आणि अन्य असंघटित क्षेत्रातील मजुरांसाठी सुरू करण्यात आली आहे. सरकारी आकड्यांनुसार देशात जवळपास ४२ कोटी लोक असंघटित क्षेत्रात काम करीत आहेत.
जर गुंतवणूकदाराचे वय १८ वर्षे असेल, तर त्याला या योजनेअंतर्गत दर महिन्याला ५५ रुपये, २९ वर्षांचा असल्यास दर महिन्याला १०० रुपये आणि ४० वर्षांचा असल्यास दर महिन्याला २०० रुपये जमा करावे लागतील. जर पेन्शन मिळण्यापूर्वीच लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास पेन्शनची ५० टक्के रक्कम त्याच्या वारसदाराला देण्यात येईल.
कोणती कागदपत्रे लागतील?
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेत खाते उघडायचे असल्यास प्रामुख्याने आधार कार्ड, आयएफएससीसह बचत जनधन खाते आणि वैध भ्रमणध्वनी क्रमांक एवढ्या गोष्टी लागतील. संघटित क्षेत्रात काम करणार्‌या व्यक्ती अथवा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफओ), नॅशनल पेन्शन स्कीम (एनपीएस) अथवा राज्य कर्मचारी विमा मंडळाचे (ईएसआईसी) सदस्य अथवा आयकर भरणारे नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.

Posted by : | on : 18 Mar 2021
Filed under : नागरी, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g