किमान तापमान : 26.74° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 40 %
वायू वेग : 4.33 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
23.87°से. - 30.99°से.
रविवार, 24 नोव्हेंबर छितरे हुए बादल24.16°से. - 28.16°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.47°से. - 29.09°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.74°से. - 28.93°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल23.99°से. - 28.72°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल23.66°से. - 29.04°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादलनवी दिल्ली, (२० जानेवारी) – राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत हॅट्ट्रिक करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी भाजपने ४ ते ११ फेब्रुवारी दरम्यान गाव चलो अभियान राबविण्याचा मेगा प्लॅन तयार केला आहे. या काळात सात लाख गावे आणि शहरातील प्रत्येक बूथवर पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या मोहिमेअंतर्गत पक्षाचे नेते मोदी सरकारचे यश आणि योजना लोकांपर्यंत पोहोचवतील.
शनिवारी भाजपाच्या राष्ट्रीय कार्यालयात गाव चलो अभियानाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी संबोधित केले. यावेळी जेपी नड्डा यांनी नेत्यांना सरकारचे यश सात लाख गाव आणि शहरी बूथपर्यंत नेण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की ४ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी दरम्यान बहुआयामी आणि व्यापक जनआंदोलन अभियान राबविण्यात येणार असून सुमारे ३० लाख कामगार त्यात सहभागी होतील. मोदी सरकारचे काम शेवटच्या माणसापर्यंत नेणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. यासाठी या अभियानांतर्गत आगामी काळात संघटनेच्या ९८८ जिल्हे आणि १६ हजार १८८ विभागांमध्ये प्रशिक्षण शिबिरे घेण्यात येणार आहेत.