किमान तापमान : 23.43° से.
कमाल तापमान : 24.3° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 53 %
वायू वेग : 4.78 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.43° से.
22.99°से. - 27.01°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश24.95°से. - 27.79°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.46°से. - 28.06°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.51°से. - 27.86°से.
सोमवार, 27 जानेवारी कुछ बादल25.2°से. - 26.87°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल24.73°से. - 26.29°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादलउमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी जाहीर केली नाही,
नवी दिल्ली, १० ऑगस्ट – निवडणुकीतील उमेदवारांची गुन्हेगारी पृष्ठभूमी जाहीर न करणार्या राजकीय पक्षांविषयी कठोर भूमिका घेत, सर्वोच्च न्यायालयाने आज मंगळवारी भाजपा आणि कॉंगे्रससह आठ राजकीय पक्षांना आर्थिक दंड ठोठावला. सोबतच, भविष्यात असे झाल्यास आणखी कठोर कारवाईचा इशाराही न्यायालयाने दिला.
बिहार विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची गुन्हेगारी पृष्ठभूमी माध्यमांमध्ये प्रकाशित करण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. मात्र, या आदेशाचे पालन न झाल्याने न्या. आर. एफ. नरिमन आणि न्या. भूषण गवई यांच्या दोन सदस्यीय न्यायासनाने ही कारवाई केली. न्यायालयाने या प्रकरणी आठ राजकीय पक्षांना दोषी ठरवले आहे. भाजपा आणि कॉंगे्रससह जदयू, आरजद, लोजपा आणि भाकपाला प्रत्येकी एक लाख रुपयाचा, तर माकप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला प्रत्येकी ५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
४८ तासांत माहिती प्रसिद्ध करा
राजकारणातून गुन्हेगारी हद्दपार करण्याच्या दिशेने प्रयत्न होणे आवश्यक आहे. गुन्हेगारी पृष्ठभूमी असलेले नेते सर्वच पक्षांमध्ये आहेत. राजकीय पक्ष अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना निवडणुकीचे तिकीटही देतात. अशा नेत्यांची माहिती पक्षांनी उमेदवारी दिल्यानंतरच्या ४८ तासांत जाहीर करावी, असा आदेशही न्यायालयाने दिला. कोणत्या राजकीय पक्षाने कुणाला उमेदवारी द्यावी, हा आमचा विषय नाही. मात्र, निवडणुकीच्या रिंगणात उभा असलेला उमेदवार कसा आहे, त्याची माहिती लोकांना कळायलाच हवी.
त्याच्याविरोधात कोणकोणते गुन्हे दाखल आहेत आणि त्यातील किती गुन्हे गंभीर आहेत, याबाबतची माहिती मतदारांना मिळायलाच हवी. तो त्यांचा हक्कच असल्याने, सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीचे तिकीट दिल्यानंतर गुन्हेगारी पृष्ठभूमी असलेल्या नेत्यांची माहिती ४८ तासांच्या आत जाहीर करणे अनिवार्य आहे, असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले.