किमान तापमान : 24.97° से.
कमाल तापमान : 24.98° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 55 %
वायू वेग : 4.96 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.98° से.
23.58°से. - 26.11°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.36°से. - 27.01°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश24.95°से. - 27.79°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.46°से. - 28.06°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.51°से. - 27.86°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.2°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी कुछ बादलसमानता येईपर्यंत कायम राहायला हवे, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांचे प्रतिपादन,
नई दिल्ली, १० ऑगस्ट – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरक्षणाचा प्रबळ समर्थक असून, जोपर्यंत समाजात विषमता आहे तोपर्यंत आरक्षण कायम राहायला पाहिजे. आरक्षण हे सकारात्मक कृतीचे साधन आहे आणि जोपर्यंत समाजातील एका विशिष्ट वर्गाला असमानतेचा अनुभव आहे, तोपर्यंत ते सुरू राहिले पाहिजे, असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी आज मंगळवारी केले.
इंडिया फाऊंडेशनतर्फे ‘मेकर्स ऑफ मॉडर्न दलित हिस्ट्री’ या पुस्तकाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. दलितांच्या इतिहासाशिवाय भारताचा इतिहास अपूर्ण असेल. सामाजिक परिवर्तनात ते अग्रेसर राहिले आहेत, असे ते म्हणाले.
मी आणि माझी संघटना रा. स्व. संघ आरक्षणाचे प्रबळ समर्थक आहोत, असे दत्तात्रेय होसबळे यांनी स्पष्टपणे सांगितले. सामाजिक समरसता आणि सामाजिक न्याय ही आमच्यासाठी राजकीय रणनीती नाही, तर हे दोन्ही आमच्यासाठी आस्थेचे विषय आहेत, असेही ते म्हणाले.
आरक्षण ही भारतासाठी ऐतिहासिक गरज असल्याचे सांगून होसबळे म्हणाले, जोपर्यंत समाजातील विशिष्ट वर्गाला असमानेचा अनुभव येत आहे तोपर्यंत ते चालू राहिले पाहिजे.
आरक्षण सकारात्मक कृतीचे साधन
आरक्षणाला सकारात्मक कृतीचे एक साधन म्हणून संबोधताना होसबळे म्हणाले की, आरक्षण आणि सलोखा (समाजातील सर्व घटकांमध्ये) एकमेकांसोबत जायला हवे. सामाजिक परिवर्तनाचे नेतृत्व करणार्या व्यक्तिमत्त्वांना दलित नेते म्हणणे अयोग्य आहे; कारण ते संपूर्ण समाजाचे नेते होते, असेही ते म्हणाले.
पाटण्यातील ठरावाची आठवण
जेव्हा आपण समाजातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वर्गातील विविध पैलूंवर चर्चा करतो, तेव्हा आरक्षणासारखे काही पैलू नेहमीच समोर येतात. माझी संघटना आणि मी अनेक दशकांपासून आरक्षणाचे समर्थक आहोत. जेव्हा अनेक ठिकाणी आरक्षण विरोधी आंदोलने झाली, तेव्हा आम्ही आरक्षणाच्या समर्थनार्थ पाटण्यात एक ठराव पारित केला होता, तसेच चर्चासत्राचेही आयोजन केले होते, असेही सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी सांगितले.