किमान तापमान : 29.81° से.
कमाल तापमान : 31.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 43 %
वायू वेग : 4.76 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.99° से.
27.3°से. - 31.99°से.
रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा27.85°से. - 31.56°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.12°से. - 31.57°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.41°से. - 30.38°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.74°से. - 30.38°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.37°से. - 29.74°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादलसरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन,
मुंबई, (५ फेब्रुवारी ) – भारतात आज प्रचंड क्षमता आहे. प्रत्येक क्षेत्रात कुशल मनुष्यबळ देशाकडे उपलब्ध आहे. विश्वगुरू होण्यासाठी संपूर्ण अनुकूल परिस्थिती आहे. संत शिरोमणी रोहिदास यांच्या समरसतेच्या तत्त्वांचे आचरण प्रत्येकाने केल्यास भारताला विश्वगुरू होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, असे ठाम प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात रविवारी पार पडलेल्या संत शिरोमणी रोहिदास जयंती सोहळ्यात ते बोलत होते. रोहिदास समाज पंचायत संघ, विभाग समिती क्रमांक ५, वसुधा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संत रोहिदास यांच्याविषयी बोलण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. भारत आज जी प्रगती करीत आहे, त्याचा मूळ आराखडा भारतीय संत परंपरेत आहे. संत रोहिदास हे त्याचाच एक भाग आहेत. त्यांचे काम आणि त्यांच्या कामाचा परिणाम पाहूनच समकालीन संतांनी त्यांना संत शिरोमणी ही उपाधी दिल्याचे सरसंघचालक म्हणाले.
अर्थार्जनाच्या अट्टाहासातून रूढींच्या चौकटी निर्माण झाल्या. त्यातून जाचक व्यवस्था निर्माण झाली. त्यातून आत्मीयतेचा बळी गेला आणि परकीयांना आपले तुकडे करून खाण्याची संधी मिळाली. इस्लामी आक्रमणानंतर स्थिती आणखी बदलली. आधी केवळ लुटीसाठी आक्रमणे होत. नंतर आपली व्यवस्थाच मुळापासून बदलणारे आक्रमण झाले, असे ते म्हणाले. संत रोहिदास यांनी सत्याची प्रचीती घेतली. सत्याचा शोध हाच त्यांचा ध्यास होता. ज्येष्ठ-कनिष्ठ हा विचारच चूक आहे, हा विचार त्यांनी ठासून मांडला. सत्य, करुणा, अंतर्बाह्य पवित्रता आणि सतत परिश्रम हाच धर्म रोहिदासांनी सांगितला. परंपरेतून आलेले काय टिकावे आणि काय टाकावे, याचे भान त्यांना होते. त्यांच्या आध्यात्मिक शक्तीमुळेच प्रतिष्ठित लोक संत रोहिदासांचे शिष्य बनल्याचे सरसंघचालकांनी सांगितले.
समरसता पोटातून यायला हवी
समरसता हा उन्नत समाजाचा पाया आहे. समरसता आज ओठात दिसते. ती पोटातून आली पाहिजे, तसा प्रयत्न करूया. एकेका प्रसंगात संत रोहिदास कसे वागले, त्याचा अभ्यास आणि आचरण करूया आणि देशाची प्रगती करूया, असे सरसंघचालक शेवटी म्हणाले.