किमान तापमान : 27.71° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 4.28 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.79°से. - 30.66°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.54°से. - 30.53°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.6°से. - 29.96°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.44°से. - 30.51°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.94°से. - 29.99°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.27°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (१८ मार्च) – भारत मंडपम येथे सोमवारपासून सुरू होणार्या स्टार्टअप महाकुंभमध्ये यशोगाथा पाहायला मिळणार आहेत. त्यात दोन हजार स्टार्टअप्स सहभागी होत आहेत. यामध्ये १० थीम पॅव्हेलियन्स, एक हजाराहून अधिक गुंतवणूकदार, ३०० इनक्यूबेटर आणि एक्सीलरेटर, तीन हजार कॉन्फरन्स प्रतिनिधी, २० हून अधिक देशांचे प्रतिनिधी, सर्व भारतीय राज्यांतील तीन हजार संभाव्य उद्योजक, ५० हून अधिक युनिकॉर्न आणि ५०,००० व्यावसायिक अभ्यागत यांचा समावेश असेल.
उद्योग आणि अंतर्गत व्यापार (डीपीआइआइटी) विभागाचे सचिव राजेश कुमार सिंग यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारपासून सुरू होणार्या तीन दिवसीय स्टार्टअप महाकुंभला भेट देऊ शकतात. एसोचैम, नैसकाम, बूटस्ट्रैप इनक्यूबेशन एंड एडवाइजरी फाउंडेशन, टीआइई आणि इंडियन वेंचर एंड अल्टरनेट कैपिटल असोसिएशन (आइवीसीए) यांच्या संयुक्त प्रयत्नांनी हा कार्यक्रम आयोजित केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला डीपीआयआयटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान स्टार्टअप हब (एमएसएच) आणि इन्व्हेस्ट इंडिया यांचेही समर्थन आहे. डीपीआयआयटीचे सहसचिव संजीव म्हणाले की, या कार्यक्रमात २३ राज्ये सहभागी होत आहेत.