किमान तापमान : 24.27° से.
कमाल तापमान : 24.82° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 67 %
वायू वेग : 3.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.27° से.
23.74°से. - 24.75°से.
रविवार, 12 जानेवारी छितरे हुए बादल22.24°से. - 25.48°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल23.36°से. - 26.54°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.78°से. - 25.15°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.96°से. - 25.5°से.
गुरुवार, 16 जानेवारी टूटे हुए बादल24.28°से. - 26.06°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (०४ जानेवारी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारताचे सर्वात मोठे ब्रँड अॅम्बेसेडर म्हटले जाते. त्यांच्या एका आवाहनाचा भारतातील लोकांवर सकारात्मक परिणाम झाल्याचे अनेकदा दिसून आले आहे. लक्षद्वीपबाबत पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा परिणामही दिसून येत आहे. वास्तविक, पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या लक्षद्वीप दौर्यावर गेले होते. लक्षद्वीपच्या समुद्रकिना-यावरील त्यांची काही छायाचित्रे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून लोकांना या ठिकाणचे सौंदर्य पाहण्याचे आवाहन केले. त्यानंतर लक्षद्वीपबद्दल जाणून घेण्यासाठी लोकांनी गुगलवर सर्च करायला सुरुवात केली. आता लक्षद्वीप गुगलवर ट्रेंड करत आहे.
लक्षद्वीप हा केरळच्या किनार्याजवळ प्रवाळ खडकांवर वसलेला एक बेट समूह आहे. लक्षद्वीप या शब्दाचा अर्थ एक लाख बेटे असा होतो. लक्षद्वीपमधील समुद्रकिनारे, निळे पाणी आणि पांढरी वाळू यासारखी सुंदर नैसर्गिक दृश्ये हे ठिकाण पाहण्यासारखे आहे. आतापर्यंत माहितीअभावी ते पर्यटकांपासून दूर राहिले. आकडेवारीनुसार २०२२ मध्ये १ लाख विदेशी पर्यटक लक्षद्वीपला भेट देण्यासाठी आले होते. हा आकडा २०२१ च्या तुलनेत फक्त ४ हजार जास्त आहे.
लक्षद्वीपमध्ये देशी पर्यटकांची संख्या खूपच कमी आहे. पीएम मोदींचे स्नॉर्कलिंग, पांढर्या वाळूवर चालताना आणि निळ्याशार समुद्राजवळचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी देशांतर्गत पर्यटकांना लक्षद्वीपला भेट देण्याचे केलेले आवाहन कामी आले. आता अनेक लोक गुगलवर लक्षद्वीप सर्च करत आहेत. हे भारतातील गुगलवर सर्वाधिक शोधले जाणारे नववे स्थान आहे. २०२१ मध्ये, पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर जम्मू-काश्मीरच्या जबरवान पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या ट्यूलिप गार्डनबद्दल आवाहन केले होते. पर्यटकांनी आयुष्यात एकदा या ट्युलिप गार्डनचे सौंदर्य पाहावे, असे ते म्हणाले. त्यानंतर पर्यटकांअभावी त्रस्त असलेले ट्युलिप गार्डन पर्यटकांनी फुलून गेले होते.