किमान तापमान : 24.75° से.
कमाल तापमान : 26.24° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 6.52 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.24° से.
23.74°से. - 26.99°से.
रविवार, 12 जानेवारी कुछ बादल22.24°से. - 25.48°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल23.36°से. - 26.54°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.78°से. - 25.15°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.96°से. - 25.5°से.
गुरुवार, 16 जानेवारी टूटे हुए बादल24.28°से. - 26.06°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलइंदूर, (०४ जानेवारी) – एका सूर्यग्रहणासह यंदाच्या वर्षात एकूण चार ग्रहण राहणार आहेत. मात्र, त्यापैकी एकही भारतातून दिसणार नसल्याची माहिती उज्जैनमधील जीवाजी वेधशाळेच्या अधिकार्याने दिली.
२०२४ मधील ग्रहणांची मालिका २५ मार्चपासून सुरू होणार आहे. या दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण आहे, अशी माहिती वेधशाळेचे अधीक्षक डॉ. राजेंद्रप्रकाश गुप्ता यांनी दिली. ज्यावेळी सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत येतात, त्यावेळी खंडग्रास ग्रहण लागते. हे ग्रहण लागेल त्यावेळी भारतात दिवस असेल. त्यामुळे ते देशात दिसणार नाही, असे गुप्ता यांनी सांगितले.
८ आणि ९ एप्रिलच्या रात्री संपूर्ण सूर्यग्रहण लागणार आहे. ते देखील भारतातून दिसणार नाही. १८ सप्टेंबरच्या सकाळी होणारे आंशिक चंद्रग्रहणही भारतातून दिसणार नाही. २ आणि ३ ऑक्टोबरच्या मध्यरात्री होणार्या कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या दर्शनापासून देशातील खगोलशास्त्रप्रेमी आणि आकाश पाहणारे वंचित राहतील, असे गुप्ता यांनी सांगितले. कंकणाकृती सूर्यग्रहण ७ मिनिटे, २१ सेकंद चालेल आणि त्याच्या शिखरावर ९३ टक्के सूर्य झाकलेला असेल, त्यामुळे ते पृथ्वीवरून चमकदार ब्रेसलेटसारखे दिसेल, असेही ते म्हणाले. मागच्या वर्षी एकूण चार ग्रहण होती. त्यात एक सूर्यग्रहण, खंडग्रास चंद्रग्रहण, वार्षिक सूर्यग्रहण आणि आंशिक चंद्रग्रहणाचा समावेश होता.