किमान तापमान : 27.99° से.
कमाल तापमान : 28.3° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 3.2 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.56°से. - 30.4°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.67°से. - 31.27°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.13°से. - 31.45°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.51°से. - 30.35°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.72°से. - 30.45°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.49°से. - 29.96°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (४ फेब्रुवारी ) – २००९ ते २०१९ असे सलग तीन वेळा निवडणूक जिंकणार्या ७१ खासदारांच्या संपत्तीमध्ये तब्बल २८६ टक्के वाढ झाली आहे, असे असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे. प्रत्येक खासदाराची संपत्ती सरासरी १७.५९ टकक्यांनी वाढली असल्याचेही या अहवालात नमूद केले आहे.
एडीआर या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या पाहणीतील निष्कर्षानुसार, २००९ च्या निवडणुकीपूर्वी अपक्षांसह विविध पक्षांच्या् उमेदवारांची सरासरी संपत्ती ६.१५ कोटी रुपये इतकी होती. २०१४ मध्ये सलग दुसर्यांदा निवडणूक जिंकलेल्या खासदारांच्या संपत्तीत १६.२३ कोटी रुपयांनी वाढ झाली तर, २०१९ लोकसभा निवडणुकीत सलग तिसर्या निवडणुकीत जिंकलेल्या ७१ खासदारांच्या संपत्तीत सरासरी २३.७५ कोटी रुपये इतकी वाढ झाली आहे.
आघाडीच्या दहामध्ये सुप्रिया सुळे
संपत्ती वाढ झालेल्या आघाडीच्या दहा खासदारांमध्ये पहिल्या क‘मांकावर शिरोमणी अकाली दलाच्या हरसिमरत कौर आहेत. यात सुप्रिया सुळे यांचा समावेश आहे. सुळे यांची संपत्ती २००९ मध्ये ५१.५३ कोटी रुपये इतकी होती. २०१९ मध्ये ही संपत्ती १४०.८८ कोटी रुपये इतकी झाली. २००९ ते २०१९ मध्ये सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीमध्ये ८९.३५ कोटी रुपयांची वाढ झाल्याचे एडीआरच्या पाहणी अहवालात नमूद आहे.
वरुण गांधींच्या संपत्तीत भरघोस वाढ
भाजपाचे खासदार वरुण गांधी यांची २००९ मध्ये संपत्ती ४.९२ कोटी रुपये इतकी होती. २०१९ मध्ये ती ६०.३२ कोटी इतकी झाली आहे. वरुण गांधी यांच्या आई आणि माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांची २००९ मध्ये असलेली १७ कोटी रुपयांची संपत्ती २०१९ मध्ये ५५ कोटी इतकी झाली.