किमान तापमान : 29.99° से.
कमाल तापमान : 30.02° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 48 %
वायू वेग : 2.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
27.14°से. - 30.61°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशतिरुवनंतपुरम्, (३० डिसेंबर) – निवडणुकांमध्ये आता तरुणांना जास्तीतजास्त संधी देण्याची वेळ आलेली आहे, असे सांगताना, पुढील वर्षी होणारी लोकसभेची निवडणूक माझ्या आयुष्यातील शेवटची असेल, असे संकेत काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी दिले. काँग्रेसच्या स्थापनादिनानिमित्त गुरुवारी येथे आयोजित कार्यक्रमाच्या अनुषंगाने थरूर पत्रकारांशी बोलत होते. मला आता निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडायचे आहे. तथापि, हे राजकारण असल्याने मी अंतिम शब्द आताच देऊ शकत नाही, असेही थरूर यांनी स्पष्ट केले.
मला असे वाटते की, आता तरुणांसाठी राजकारणात जागा निर्माण करण्याची वेळ आलेली आहे. हे माझे व्यक्तिश: मत आहे, असे सांगताना ते म्हणाले की, राजकारणात आणखी एक म्हण आहे आणि ती म्हणजे ‘कधीच नाही म्हणू नका.’ अलिकडेच तुम्ही टीव्हीवरील एका मुलाखतीत, ‘पुढील लोकसभेची निवडणूक माझ्यासाठी शेवटची असेल,’ असे जाहीर केले होते, याकडे पत्रकारांनी त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, मी ‘कधीच लढणार नाही,’ असा शब्दप्रयोग केलेला नाही. मी त्या मुलाखतीत केवळ आपले मत व्यक्त केले होते.