किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 23.93° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.93° से.
23.71°से. - 24.88°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (०३ फेब्रुवारी) – राज्यसभा निवडणुकीत दुसर्यांदा निवडून आलेले आपचे संजयसिंह आज सभापती जगदीप धनकड यांनी अनुमती नाकारल्यामुळे राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेऊ शकले नाही. उत्पादन शुल्क घोटाळ्यात गेल्या काही महिन्यांपासून संजयसिंंह तुरुंगात आहे. तुरुंगात असतानाच त्यांनी राज्यसभेची निवडणूक लढवली आणि जिंकलीही. दिल्लीतील राज्यसभेच्या तीन जागांसाठी आपचे संजयसिंह, नारायणदास गुप्ता आणि स्वाती मालिवाल असे तीन जण अविरोध विजयी झाले होते. यापैकी नारायणदास गुप्ता आणि स्वाती मालिवाल यांनी मागील आठवड्यात राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. मात्र, त्यावेळी तुरुंगात असल्यामुळे संजयसिंह शपथ घेऊ शकले नव्हते.
राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यासाठी तुरुंगातून राज्यसभेत जाण्याची परवानगी न्यायालयाने संजयसिंह यांना दिली होती. त्यानुसार आज संजयसिंह यांना राज्यसभेत आणण्यात आले. मात्र, राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांनी संजयसिंह यांना शपथ देण्यास नकार दिला. मागील अधिवेशनात संजयसिंह यांना सभागृहातून निलंबित करण्यात आले होते. त्यांचे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे सोपविण्यात आले होते. समितीचा अहवाल अजून न आल्यामुळे संजयसिंह यांना शपथ घेण्याची अनुमती धनकड यांनी नाकारली.
सभापतींनी संजयसिंह यांना आपल्या दालनात शपथ देण्याची तयारी दर्शवली होती; मात्र सभागृहात शपथ घेण्यावर ते अडले होते. न्यायालयाने सभागृहाच्या कामकाजात सहभागी होण्याची परवानगी संजयसिंह यांना दिली नव्हती. त्यामुळे त्यांना सभागृहात येण्याची आणि शपथ घेण्याची अनुमती धनकड यांनी दिली नाही. परिणामी संसद भवन परिसरात येऊनही आज संजयसिंह यांना शपथ घेता आली नाही. विशेषाधिकार समितीचा अहवाल आल्यानंतरच आता सदस्यत्वाची शपथ घेता येईल, असे दिसते.