किमान तापमान : 23.93° से.
कमाल तापमान : 25.3° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 6.71 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.3° से.
23.71°से. - 25.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (०३ फेब्रुवारी) – रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे ९ आणि १० फेब्रुवारीला राजधानी दिल्लीत सुशासन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रबोधिनीचे उपाध्यक्ष आणि भारत सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी आज दिली. डॉ. आंबेडकर इंटरनॅशल सेंटरमध्ये आयोजित या द्विवसीय सुशासन महोत्सवाचे उद्घाटन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा करणार आहेत. प्रबोधिनीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित राहतील, असे कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये आयोजित पत्रपरिषदेत डॉ. सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वशर्मा, जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा, भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांच्या मुलाखती या महोत्सवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी मंत्रालये तसेच राज्य सरकारांकडून विविध कल्याणकारी योजना आणि कार्यक्रम राबवले जात आहे, त्याचे प्रदर्शनही यावेळी आयोजित करण्यात आले आहे. पूनावाला फिनकॉर्प या सुशासन महोत्सवाचे प्रायोजक तर इस्कॉन गोवर्धन इकोव्हिलेज सहप्रायोजक आहेत. सुशासन महोत्सवात विविध राज्यातील तसेच स्वयंसेवी संघटनांचे दीड हजारावर प्रतिनिधी सहभागी होणार आहे, असे ते म्हणाले. पत्रपरिषदेला दिल्ली प्रदेश भाजपा अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि सुशासन महोत्सवाचे मुख्य समन्वयक प्रो. पीयूष गिरगावकर उपस्थित होते.