किमान तापमान : 24.16° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 54 %
वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
23.71°से. - 26.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– ज्ञानवापी प्रकरण हस्तांतरित होणार नाही,
नवी दिल्ली, (०३ नोव्हेंबर) – ज्ञानवापी प्रकरणी २०२१ पासून सुनावणी करणार्या एकलपीठाकडून ही याचिका हस्तांतरित करण्याच्या अलाहबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी घेतलेल्या निर्णयाला आव्हान देत अंजुमन इंतेझामिया मशीद समितीने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. वाराणसीत ज्या ठिकाणी ज्ञानवापी मशीद अस्तित्वात आहे, त्या ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची मागणी करणार्या याचिकेच्या टिकाऊपणाला आव्हान देणार्या याचिकेवर अलाहबाद उच्च न्यायालयाच्या एकलपीठासमोर सुनावणी सुरू होती.
हुझेफा अहमदी यांनी मशीद समितीच्या वतीने केलेला युक्तिवाद ऐकल्यानंतर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड प्रमुख असलेल्या आणि न्या. जे. बी. पार्डीवाला व न्या. मनोज मिश्रा यांचा समावेश असलेल्या न्यायासनाने ही याचिका फेटाळत असल्याचे सांगितले. मुख्य न्यायाधीशांनी दिलेल्या आदेशात आम्ही हस्तक्षेप करणार नाही. उच्च न्यायालयांमधील ही एक प्रमाणित प्रथा आहे. हे उच्च न्यायालयातील मुख्य न्यायधीशांच्या कार्यक्षेत्रात असले पाहिजे, असे न्यायासनाने याचिका फेटाळताना स्पष्ट केले. हे प्रकरण दुसर्या पीठाकडे हस्तांतरित करण्याचे कारणही देण्यात आले आहे. मात्र, ते खुल्या न्यायालयात वाचून दाखवू शकत नाही, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्ट केले.