Posted by वृत्तभारती
Tuesday, March 12th, 2024
– सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर स्टेट बँकेची कृती, नवी दिल्ली, (१२ मार्च) – सर्वोच्च न्यायालयाने झापल्यानंतर भारतीय स्टेट बँकेने निवडणूक रोख्यांचे तपशील मुख्य निवडणूक आयुक्तालयाकडे मंगळवारी सायंकाळी सादर केले. हे तपशील संकलित करून शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध केले जातील. या संदर्भातील प्रतिज्ञापत्र तयार असून, ते लवकरच सादर केले जाईल, असे स्टेट बँकेने म्हटले आहे. न्यायालयाने यापूर्वी ६ मार्चपर्यंत ही माहिती सादर करण्याचा आदेश स्टेट बँकेला दिला होता....
12 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, January 8th, 2024
नवी दिल्ली, (०८ जानेवारी) – खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे २३ मार्च २०२३ पासून रिक्त असलेल्या पुणे लोकसभा जागेसाठी तातडीने पोटनिवडणूक घेण्यात यावी, या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली. विद्यमान लोकसभेचा कालावधी १६ जून रोजी संपुष्टात येणार आहे. अशा स्थितीत पोटनिवडणूक़ घेणे व्यावहारिकदृष्ट्या योग्य होणार नाही आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारही नाही, असा युक्तिवाद निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. जे. बी. पार्डीवाला आणि न्या....
8 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, December 13th, 2023
– सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे प्रतिपादन, मुंबई, (१३ डिसेंबर) – समाज माध्यमाचा वापर वाढल्याने जगभरातील समुदायांमध्ये ध्रुवीकरण झाले तसेच असहिष्णुता वाढीस लागली आहे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले. भारताची बहुलतावादी संस्कृती आणि संवादात गुंतण्याची क्षमता हे त्याच काळात स्वातंत्र्य मिळालेल्या परंतु लोकशाही टिकवून ठेवू शकलेल्या इतर अनेक देशांपेक्षा वेगळे आहे, असे धनंजय चंद्रचूड यांनी जमनालाल बजाज पुरस्कार सोहळ्याला संबोधित करताना सांगितले. जागतिकीकृत जगामध्ये आपण जे ध्रुवीकरण पाहतो, उजवे आणि...
13 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, December 11th, 2023
– घटनेतील सर्व तरतुदी तिथेही लागू होतात, – जम्मू-काश्मीर भारताचे अविभाज्य अंग, – सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, नवी दिल्ली, (११ डिसेंबर) – जम्मू-काश्मीर हे भारताचेच अविभाज्य अंग आहे आणि आपल्या राज्य घटनेतील सर्व तरतुदी तिथेही लागू होतात, असे स्पष्ट करताना, जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० निष्प्रभ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्यच होता, असा ऐतिहासिक आणि एकमुखी निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने सोमवारी दिला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. भूषण...
11 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, December 4th, 2023
– सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केले घटनापीठ, नवी दिल्ली, (०४ डिसेंबर) – दिवाणी आणि फौजदार खटल्यांमध्ये कनिष्ठ कींवा उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर ती पुन्हा वाढविण्यात आली नाही तर, स्थगितीचा तो निर्णय सहा महिन्यांनंतर आपोआपच कालबाह्य ठरत असतो, या २०१८ मध्ये दिलेल्या आपल्या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय घटनापीठ स्थापन केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, या घटनापीठात न्या. अभय ओक,...
4 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, November 4th, 2023
– ज्ञानवापी प्रकरण हस्तांतरित होणार नाही, नवी दिल्ली, (०३ नोव्हेंबर) – ज्ञानवापी प्रकरणी २०२१ पासून सुनावणी करणार्या एकलपीठाकडून ही याचिका हस्तांतरित करण्याच्या अलाहबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी घेतलेल्या निर्णयाला आव्हान देत अंजुमन इंतेझामिया मशीद समितीने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. वाराणसीत ज्या ठिकाणी ज्ञानवापी मशीद अस्तित्वात आहे, त्या ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची मागणी करणार्या याचिकेच्या टिकाऊपणाला आव्हान देणार्या याचिकेवर अलाहबाद उच्च न्यायालयाच्या एकलपीठासमोर सुनावणी सुरू होती. हुझेफा अहमदी...
4 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, November 2nd, 2023
– महान्यायाभिकर्ता तुषार मेहता, नवी दिल्ली, (०२ नोव्हेंबर) – राजकीय पक्षांना इलेक्टोरल बॉण्ड्सच्या माध्यमातून देणगी मिळते. या बॉण्ड्सला विरोध करणार्या याचिकांवर बुधवारी झालेल्या सुनावणीत, सर्वाधिक देणग्या सत्ताधारी पक्षाला कशा मिळतात, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. यावेळी केंद्राच्या वतीने महान्यायाभिकर्ता तुषार मेहता म्हणाले की, पूर्वी पक्षांना रोख स्वरूपात मोठ्या प्रमाणात देणग्या मिळायच्या. आता हे बंद झाले आहे....
2 Nov 2023 / No Comment / Read More »