किमान तापमान : 27.33° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.44 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.56°से. - 30.97°से.
शुक्रवार, 15 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.35°से. - 30.7°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.27°से. - 30.86°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.52°से. - 31.46°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.53°से. - 30.46°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.82°से. - 30.45°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश– महान्यायाभिकर्ता तुषार मेहता,
नवी दिल्ली, (०२ नोव्हेंबर) – राजकीय पक्षांना इलेक्टोरल बॉण्ड्सच्या माध्यमातून देणगी मिळते. या बॉण्ड्सला विरोध करणार्या याचिकांवर बुधवारी झालेल्या सुनावणीत, सर्वाधिक देणग्या सत्ताधारी पक्षाला कशा मिळतात, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. यावेळी केंद्राच्या वतीने महान्यायाभिकर्ता तुषार मेहता म्हणाले की, पूर्वी पक्षांना रोख स्वरूपात मोठ्या प्रमाणात देणग्या मिळायच्या. आता हे बंद झाले आहे. राजकारणातील काळ्या पैशावर आळा घालण्यासाठी इलेक्टोरल बॉण्डची प्रणाली लागू केली आहे.
सर्वाधिक देणग्या सत्ताधारी पक्षाला का मिळतात, या प्रश्नावर तुषार मेहता म्हणाले की, देणगीदार नेहमीच पक्षाची विद्यमान स्थिती पाहून देणगी देतात. या प्रणालीला सत्ताधारी पक्षाला लाभ देणारे म्हणणे चुकीचे ठरेल. २००४ ते २०१४ दरम्यान ही व्यवस्था अस्तित्वात नसतानाही सत्ताधारी पक्षाला सर्वाधिक देणग्या मिळाल्या. इलेक्टोरल बॉण्डद्वारे पक्षांना बँकिंग प्रणालीद्वारे पैसे मिळतील, याची खात्री केली आहे.