किमान तापमान : 23.88° से.
कमाल तापमान : 23.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 2.37 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.74°से. - 24.84°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.48°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल23.36°से. - 26.54°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.78°से. - 25.15°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.96°से. - 25.5°से.
गुरुवार, 16 जानेवारी टूटे हुए बादल24.28°से. - 26.06°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, ६ नोव्हेंबर – चीनला जोडणार्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कोणताही एकतर्फी बदल भारत कधीच मान्य करणार नाही, असा स्पष्ट इशारा तीनही सशस्त्र दलांचे सेनापती जनरल बिपीन रावत यांनी आज शुक्रवारी दिला. सीमेवर ‘जैसे थे’ स्थिती कायम राखण्यासाठी आमच्या फौजा वचनबद्ध आहेत. ही स्थिती बदलण्यासाठी चीनच्या सैनिकांनी अनावश्यक धाडस करून पाहिले आणि त्याची मोठी किंमतही त्यांना चुकवावी लागली, असेही रावत यांनी स्पष्ट केले.
चीनचे सैनिक ज्या प्रकारे कुरापती करीत आहेत, त्यावरून नजीकच्या भविष्यात आणखी मोठा संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा अचानक उद्भवणार्या कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी आपल्या फौजा पूर्णपणे सक्षम आहेत, असे जनरल रावत यांनी आभासी चर्चासत्रात सांगितले.
लडाखच्या पूर्व सीमेवर सध्या शांतता दिसत असली, तरी अजूनही तणाव कायम आहे. हा तणाव वाढणार नाही, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहोत. भारताविरोधात कुरापती करण्यासाठी चीनने आता पाकिस्तानलाही सोबत घेतले आहे. यामुळे प्रादेशिक स्थैर्याला धोका निर्माण होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
म्हणूनच बिघडले पाकिस्तानसोबतचे संबंध
अतिरेक्यांची घुसखोरी, त्यांच्या माध्यमातून होणार हल्ले, समाजमाध्यमांवर सुरू असलेला भारतविरोधी प्रचार आणि भारतातील शांतता व सलोखा खंडित करण्याचे प्रयत्न यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध बिघडले आहेत. अतिरेक्यांची घुसखोरी आणि भारतविरोधी कारवाया कदापि मान्य होणार नाही. पाकिस्तानला याबाबत कडक संदेश पाठविण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोट हवाई हल्ला करण्यात आला, असे त्यांनी सांगितले.
काश्मीरचा विचार मनातून काढावा
सर्वच आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पाकिस्तान सातत्याने काश्मीरचा मुद्दा उपस्थित करीत असतो. या देशाची आर्थिक स्थिती अतिशय वाईट आहे. दहशतवाद्यांना आश्रय दिल्याने, हा देश एफएटीएफच्या काळ्या यादीच्या उंबरठ्यावर आला आहे. आपल्या देशाची घडी नीट कशी बसेल, याकडे पाकिस्तानने लक्ष देण्याची गरज आहे आणि त्यासाठी त्यांनी काश्मीरचा विचार मनातून काढायला हवा, असेही ते म्हणाले.