किमान तापमान : 23.93° से.
कमाल तापमान : 25.3° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 6.71 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.3° से.
23.71°से. - 25.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (२५ डिसेंबर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदूरमधील हुकुमचंद मिलच्या कामगारांना सुमारे २२४ कोटी रुपयांचे धनादेश अधिकृत लिक्विडेटर आणि हुकुमचंद मिलच्या कामगार संघटनेच्या प्रमुखांना सोपवले. पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कनकेश्वरी मैदानावर आयोजित ’कामगार हिताला समर्पित’ कामगार कार्यक्रमाला संबोधित केले.
ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, ’आजचा कार्यक्रम आमच्या कार्यकर्त्यांच्या स्वप्नांचे आणि जिद्दीचे फळ आहे. ’गुड गव्हर्नन्स डे’ निमित्त आयोजित या कार्यक्रमासाठी मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. आज २२४ कोटी रुपयांचे धनादेश सोपवण्यात आले आहेत. येत्या काही दिवसांत हा पैसा आमच्या कामगारांपर्यंत पोहोचेल. मला माहीत आहे की तुम्ही अनेक अडचणींचा सामना केला आहे. पण आता तुमचे भविष्य उज्ज्वल आहे. कामगारांना न्याय मिळाला तो दिवस म्हणून इंदूरची जनता २५ डिसेंबर स्मरण ठेवेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ’जेव्हा हुकुमचंद मिलच्या कामगारांसाठी पॅकेज जाहीर करण्यात आले तेव्हा इंदूरमध्ये उत्सवाचे वातावरण होते. या निर्णयामुळे आपल्या कामगार बंधू-भगिनींमध्ये सणाचा आनंद आणखी वाढला आहे. आजचा कार्यक्रम सुद्धा खास आहे कारण आज अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आणि सुशासन दिन आहे, अटलजींचे मध्य प्रदेशशी असलेले नाते आपल्या सर्वांना माहीत आहे.