किमान तापमान : 30.02° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 45 %
वायू वेग : 2.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
26.96°से. - 31°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची सरकार,
नवी दिल्ली, (३० डिसेंबर) – सध्या सुरू असलेल्या ‘आयुष्मान भव’ मोहिमेदरम्यान ४.४ कोटी आयुष्मान कार्ड तयार करण्यात आले असून या कार्डच्या माध्यमातून प्रति कुटुंब प्रति वर्ष ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करू शकतात. या मोहिमेदरम्यान पाच कोटींहून अधिक आयुष्मान भारत आरोग्य खाती (एबीएचए) तयार करण्यात आली, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले. हे २८ डिसेंबरपर्यंतच्या डेटाचे प्रतिबिंब आहे, असे त्यात म्हटले आहे.
आयुष्मान भव मोहिमेअंतर्गत २८ डिसेंबरपर्यंत आयुष्मान आरोग्य मंदिर मेळावे व सामूहिक आरोग्य केंद्र मेळाव्यांची संख्या ११ कोटींहून अधिक झाली आहे. या आरोग्य मेळाव्यांची एकूण संख्या १३.८ लाख इतकी आहे. या आरोग्य मेळाव्यात ९ लाख २१ हजार ७८३ लोकांना तंदुरुस्ती, योग, ध्यान-धारणांबाबत सल्ला देण्यात आला. यात दूरध्वनीच्या माध्यमातून १ लाख २ हजारपेक्षा जास्त लोकांशी सल्लामसलत करण्यात आली. याशिवाय सुमारे ६.४ कोटी लोकांना मोफत औषधे आणि ५.१ कोटी लोकांना मोफत निदान सेवा मिळाली.
याशिवाय ७४ लाख ४ हजार ३५६ लोकांना आयुष सेवा मिळाली आणि १० कोटी ९९ लाख ६३ हजार ८९१ लोकांना दैनंदिन जीवनशैलीबाबत समुपदेशन करण्यात आले. तसेच ४५ लाख ४३ हजार ७०५ गरोदर मातांनी पहिल्या तिमाहीत नोंदणी केली आणि प्रथम संपूर्ण न्यूट्रोफिल काऊंट (एएनसी) तपासणी पूर्ण केली. २९ लाखांहून अधिक माता व ४९ लाख बालकांना लसीकरण करण्यात आले. १८.९ कोटी लोकांसाठी टीबी, उच्च रक्तदाब, मधुमेह, मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग व मोतीबिंदू – अशा सात प्रकारची तपासणी करण्यात आली.