किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 23.93° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.93° से.
23.71°से. - 24.88°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (०१ नोव्हेंबर) – प्राप्तिकर विभागाने ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत प्राप्तिकर परतावा (आयटीआर) भरणार्यांची विक्रमी संख्या नोंदवली आहे. कोणतेही आंतरराष्ट्रीय अथवा देशांतर्गत विशिष्ट व्यवहार नसलेल्या आणि ज्यांच्या खाते पुस्तकांचे लेखा परीक्षण करणे आवश्यक होते, अशा करदात्यांसाठी, आयटीआर (आयटीआर ७ व्यतिरिक्त) भरण्याची ही अंतिम तारीख होती.
आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत ७.६५ कोटी पेक्षा जास्त आयटीआर दाखल करण्यात आले, जे ७ नोव्हेंबर २०२२ पर्यंत आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी दाखल केलेल्या ६.८५ कोटी आयटीआरच्या तुलनेत ११.७% जास्त आहे, मागील वर्षात असे आयटीआर दाखल करण्याची ती अंतिम तारीख होती.
तसेच, आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंतच्या सर्व मूल्यांकन वर्षांसाठी दाखल केलेल्या आयटीआर ची एकूण संख्या ७.८५ कोटी आहे, जी आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये दाखल केलेल्या एकूण ७.७८ कोटी आयटीआरच्या तुलनेत, आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे.
आर्थिक वर्ष २३-२४ साठी दाखल केलेल्या ७.६५ कोटी आयटीआरपैकी ७.५१ कोटी पेक्षा जास्त आयटीआरची यापूर्वीच पडताळणी करण्यात आली आहे. तसेच, पडताळणी करण्यात आलेल्या ७.५१ कोटी आयटीआरपैकी, ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत ७.१९ कोटी आयटीआरवर यापूर्वीच प्रक्रिया करण्यात आली आहे. म्हणजे, पडताळणी करण्यात आलेल्या जवळजवळ ९६% आयटीआर वर प्रक्रिया करण्यात आली आहे.
फॉर्म १०बी, १०बीबी आणि फॉर्म ३सीईबी यासारखे काही वैधानिक दृष्ट्या महत्वाचे अर्ज भरण्यासाठी ३१ ऑक्टोबर २०२३ ही अंतिम तारीख होती. ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत १.४४ कोटींहून अधिक विविध प्रकारचे वैधानिक फॉर्म भरले गेले आहेत.
सर्व करदाते आणि कर व्यावसायिकांनी अनुपालनासाठी दिलेल्या पाठींब्याबद्दल आयटी विभागाने, कृतज्ञता व्यक्त केली आहे, आणि ज्या करदात्यांनी अद्याप फॉर्म अथवा आयटीआर भरले नाहीत, त्यांनी ते दाखल करावेत, अशी विनंती केली आहे. सर्व करदाते आणि कर व्यावसायिकांनी कर अनुपालन विहित वेळेत करत राहावे, असे आवाहन प्राप्तिकर विभागाने केले आहे.