किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (०१ नोव्हेंबर) – एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या काळातील एकत्रित आकडेवारीनुसार, भारतीय रेल्वेने गेल्या वर्षीच्या ८५५.६४ मेट्रिक टन मालवाहतुकीच्या तुलनेत ८८७.२५ मेट्रिक टन मालवाहतुकीचा टप्पा गाठला आहे, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीमधील मालवाहतुकीच्या तुलनेत अंदाजे ३१.६१ मेट्रिक टन इतकी जास्त आहे.
भारतीय रेल्वेने यंदा ९५९२९.३० कोटी रुपयांचा महसूल मिळवला असून, गेल्या वर्षीच्या ९२३४५.२७ कोटी रुपयांच्या तुलनेत यामध्ये सुमारे ३५८४.०३ कोटी रुपयांची वृद्धी झाली आहे.
ऑक्टोबर २०२३ मध्ये भारतीय रेल्वेने सुरुवातीच्या स्थानकापासून केलेली मालवाहतूक १२९.०३ मेट्रिक टन इतकी होती. ऑक्टोबर २०२२ मध्ये ती ११८.९५ मेट्रिक टन इतकी होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या मालवाहतुकीच्या तुलनेत यामध्ये अंदाजे ८.४७% वाढ नोंदवली गेली आहे.
मालवाहतुकी द्वारे जमा झालेला महसूल ऑक्टोबर २०२२ मध्ये १३३५३.८१ कोटी इतका होता. ऑक्टोबर २०२३ मध्ये त्याने १४२३१.०५ कोटी रुपयाचा टप्पा गाठला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये ६.५७% इतकी वृद्धी नोंदवली गेली आहे.
ऑक्टोबर २०२३ मध्ये भारतीय रेल्वेने मेट्रिक टन कोळसा, १४.८१ मेट्रिक टन लोह खनिज, ५.७४ मेट्रिक टन पिग आयर्न आणि फिनिश्ड स्टील, ६.३२ मेट्रिक टन सिमेंट (क्लिकंर वगळता), ३.६२ मेट्रिक टन अन्नधान्य, ५.७२ मेट्रिक टन खते, ४.३५ मेट्रिक टन खनिजे, ७.१५ मेट्रिक टन कंटेनर, आणि ८.५५ मेट्रिक टन इतर वस्तूंच्या स्वरूपातील मालवाहतूक केली.
हंग्री फॉर कार्गो या मंत्राला अनुसरून, भारतीय रेल्वेने व्यवसाय सुलभतेसाठी तसेच स्पर्धात्मक किमतीला सेवा वितरणामध्ये सुधारणा करण्यासाठी सातत्त्याने प्रयत्न केले आहेत. ग्राहक केंद्रित दृष्टीकोन आणि जलद धोरण निर्मितीच्या सहाय्याने व्यवसाय विकास केंद्रांनी केलेल्या कामामुळे रेल्वेला हे मोठे यश मिळवण्यामध्ये सहाय्य झाले.