किमान तापमान : 24.05° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 6.18 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (०१ नोव्हेंबर) – केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री, भूपेंद्र यादव यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या ७१व्या स्थापना दिनाचे आभासी माध्यमातून उद्घाटन केले. यावेळी त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली, श्रम आणि रोजगार सचिव आरती आहुजा आणि केंद्रीय पीएफ आयुक्त नीलम शमी राव, ईएसआयसी चे महासंचालक डॉ. राजेंद्र कुमार हे देखील यावेळी उपस्थित होते.
गेल्या काही वर्षांतील ईपीएफओ चा चढता आलेख आणि सदस्यांच्या बचतीच्या मोठ्या निधीचे करत असलेले व्यवस्थापन याबद्दल भूपेंद्र यादव यांनी संतोष व्यक्त केला. प्रत्येक महिन्याच्या २७ तारखेला जिल्हा स्तरावर प्रत्येक ईपीएफओ कार्यालयाद्वारे आयोजित केलेल्या ’निधी आपके निकट’ या संपर्क कार्यक्रमाचीही त्यांनी प्रशंसा केली. केंद्रीय मंत्र्यांनी असेही सांगितले की ईपीएफओ ने ३१ ऑक्टोबर २०१९ पासून जम्मू आणि कश्मीरमधील कामगार वर्गासाठी लागू असलेल्या कायद्याच्या तरतुदींचा विस्तार केला आहे.
यादव यांनी ईपीएफओला सुलभ आणि तंत्रज्ञानाधारित संस्था बनण्यासाठी प्रोत्साहन दिले. ईपीएफओ यावर्षी ८.१५% व्याज देत असून २४ कोटींहून अधिक खात्यांमध्ये तिने आधीच व्याजाची रक्कम वर्ग केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
रामेश्वर तेली यांनी ईपीएफओ च्या ७१ व्या स्थापना दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. इम्फाल, इटानगर, आयझॉल, दिमापूर आणि गंगटोक येथील विशेष राज्य कार्यालयांद्वारे ईशान्येकडील राज्यांमधील सदस्य आणि वृद्ध निवृत्तीवेतनधारकांपर्यंत सेवा पोहोचवण्यासाठी ईपीएफओ ने घेतलेल्या पुढाकारांची त्यांनी प्रशंसा केली.
या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, राज्यमंत्र्यांनी राज्य रूपरेषा पुस्तिका २०२३, स्थापना ई-अहवाल आणि ५० महत्वाच्या निर्णयांचा संग्रह आणि कम्युनिकेशन फ्रेमवर्क दस्तऐवज, ऑडिट मॅन्युअल, रिकव्हरी मॅन्युअल आणि सूट मॅन्युअलच्या दुसर्या आवृत्तीचे अनावरण केले.
मिशन कर्मयोगी ईपीएफओ प्रशिक्षण आणि क्षमता निर्माण या विषयावर ईपीएफओ च्या अधिकार्यांच्या प्रशिक्षणाचा प्रासंगिक प्रवास दाखवणारा चित्रपट दाखवण्यात आला. या कार्यक्रमात विविध कार्यालये आणि आस्थापनांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.