|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:33 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 27.71° से.

कमाल तापमान : 27.99° से.

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 51 %

वायू वेग : 4.28 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

27.99° से.

हवामानाचा अंदाज

27.79°से. - 30.66°से.

शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.54°से. - 30.53°से.

रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.6°से. - 29.96°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.44°से. - 30.51°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.94°से. - 29.99°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.27°से. - 30.16°से.

गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश
Home »

मुख्यमंत्री शिंदे यांचे प्रसंगावधान; वाचवले दुचाकीस्वाराचे प्राण

मुख्यमंत्री शिंदे यांचे प्रसंगावधान; वाचवले दुचाकीस्वाराचे प्राण– जखमी रुग्णाला घेऊन मुख्यमंत्री स्वतः पोहोचले हॉस्पिटलमध्ये, – मुख्यमंत्र्यांच्या समयसूचकतेमुळे चार रुग्णांचे वाचले जीव, नागपूर, (१८ डिसेंबर) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवदूताप्रमाणे धावून आल्याने एका व्यक्तीचे प्राण वाचले आहेत. या व्यक्तीसह अन्य तिघांना मदत करुन मुख्यमंत्र्यांनी त्यांना तत्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्याचे निर्देश संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांना दिले. मुंबईहून नागपुरला परतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ बाजार गावातील सोलर अर्नामेंट्स कंपनीला भेट देऊन पाहणी केली. या...18 Dec 2023 / No Comment / Read More »

आमदार अपात्रतेच्या निर्णयाला मुदत वाढ

आमदार अपात्रतेच्या निर्णयाला मुदत वाढनवी दिल्ली, (१५ डिसेंबर) – शिवसेना शिंदे गट अपात्रता प्रकरणी निर्णय घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना आणखी वेळ दिला आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांच्या वतीने विधानसभा सचिवालयाने शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाला तीन आठवड्यांची मुदत वाढवून देण्याची विनंती केली होती, परंतु सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना प्रलंबित प्रकरणांवर निर्णय घेण्यासाठी आणखी दहा दिवसांची मुदत दिली. मात्र १० जानेवारी २०२४ पर्यंत निर्णय देण्यास सांगण्यात आले आहे. विद्यमान मुख्यमंत्री...15 Dec 2023 / No Comment / Read More »

एका ऐतिहासिक पर्वाचा प्रारंभ : एकनाथ शिंदे

एका ऐतिहासिक पर्वाचा प्रारंभ : एकनाथ शिंदेनागपूर, (११ डिसेंबर) – कलम ३७० प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी ऐतिहासिक निकाल सुनावला असून न्यायालयाच्या या निर्णयामुळे एका ऐतिहासिक पर्वाचा प्रारंभ होत असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवनाच्या परिसरात माध्यमासमोर व्यक्त केली. जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय कायदेशीरदृष्ट्या योग्य होता, असे न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी देशाची एकात्मता राखणारे योग्य पाऊल उचलले होते, ते...11 Dec 2023 / No Comment / Read More »

महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे महामानवास अभिवादन

महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे महामानवास अभिवादनमुंबई, (०६ डिसेंबर) – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. दादर येथील चैत्यभूमी येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार राहुल शेवाळे, आमदार आशिष शेलार, प्रवीण दरेकर,सदा...6 Dec 2023 / No Comment / Read More »

मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक

मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक– मुख्यमंत्री शिंदेंच्या विरोधातील आक्षेपार्ह टिप्पणी भोवली, मुंबई, (३० नोव्हेंबर) – मुंबईचे माजी महापौर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते दळवी यांना बुधवारी मुंबई पोलिसांनी अटक केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधातील आक्षेपार्ह टिप्पणी त्यांना भोवली आहे. मुंबईतील उपनगर भांडुप येथे उद्धव ठाकरे गटाच्या रविवारी झालेल्या बैठकीत दळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे तपासात आढळले, अशी माहिती भांडुप पोलिसांनी दिली. त्या आधारे दळवी यांच्याविरोधात भादंवितील कलम १५३ (ए) (धर्म,...30 Nov 2023 / No Comment / Read More »

उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर वादग्रस्त टीका

उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर वादग्रस्त टीका– शिंदे सरकारने मागवली भाषणाची सीडी, मुंबई, (२९ नोव्हेंबर) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेलंगणाच्या दौर्यावर आहेत. ही संधी साधत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर वादग्रस्त टीका केली. त्यांच्या वक्तव्याची सीडी मागवण्यात आली असून, त्यावर कायदेशीर मत घेतले जाणार असल्याचे देसाई म्हणाले. जी व्यक्ती राज्यात शेतकर्यांची मदत करीत नाही, दुसर्या राज्यात दुसर्या पक्षाच्या प्रचाराला जाते, अशी व्यक्ती राज्य चालवण्यासाठी नालायक आहे, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना...29 Nov 2023 / No Comment / Read More »

प्रदूषण नियंत्रणासाठी आधुनिक साधनसामग्री वापरा: मुख्यमंत्री

प्रदूषण नियंत्रणासाठी आधुनिक साधनसामग्री वापरा: मुख्यमंत्रीमुंबई, (२१ नोव्हेंबर) – गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येणार्‍या उपाययोजनांची तसेच स्वच्छतेच्या कामाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंगळवारी पहाटे फिरून प्रत्यक्ष पाहणी केली. प्रदूषण नियंत्रणासाठी आधुनिक साधनसामग्री वापरण्याची सूचना त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासन इकबाल सिंह चहल यांना केली. मुख्यमंत्री म्हणाले की, शहरात मागील काही दिवसांत वाढलेले प्रदूषणाचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. रस्त्यांवरील हवेतील धुलीकण कमी करण्यासाठी दिवसाआड...21 Nov 2023 / No Comment / Read More »

गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर गुरुकुलाचे भूमिपूजन

गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर गुरुकुलाचे भूमिपूजन– लता युग’ अविस्मरणीय, ठाण्यात भूमिपूजन सोहळा, ठाणे, (२० नोव्हेंबर) – देशाची शान असलेल्या गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृती चिरंतन ठेवणारे स्व.लता मंगेशकर संगीत विद्यालयाचे (गुरुकुल) भूमिपूजन ठाण्यात झाले. हे गुरुकुल भारतीय संगीताचा अनमोल वारसा पुढच्या पिढीला देण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. राज्य शासनाच्या महानगरपालिका क्षेत्रातील मूलभूत सोयीसुविधांचा विकास या योजनेंतर्गत ठाणे महापालिका क्षेत्रातील रेप्टोक्रॉस आरक्षित भूखंड, वर्तकनगर, ठाणे येथे भारतरत्न स्व. लता दीनानाथ...20 Nov 2023 / No Comment / Read More »

शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात

शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात– मार्गदर्शक तत्त्वांना राज्य मंत्रिमंडळाची मान्यता, मुंबई, (१८ नोव्हेंबर) – राज्यातील शिक्षण संस्थांना समूह विद्यापीठ स्थापण्याकरिता मार्गदर्शक तत्त्वांना शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे विद्यापीठांवरील भार होऊन शैक्षणिक संस्थांचे एक शक्तिशाली जाळे तयार होईल आणि विद्यर्थ्यांना अधिक संधी प्राप्त होतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेत ही बैठक झाली. बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, कुलपती या नात्याने राज्यपाल या समूह विद्यापीठांच्या कुलगुरूंची नियुक्ती करतील. ही विद्यापीठे सार्वजनिक राहणार आहेत. राष्ट्रीय...18 Nov 2023 / No Comment / Read More »

माधुरी दीक्षित भाजपच्या तिकिटावर लढवणार लोकसभा निवडणूक?

माधुरी दीक्षित भाजपच्या तिकिटावर लढवणार लोकसभा निवडणूक?मुंबई, (१७ नोव्हेंबर) – सिनेविश्वात तिची जादू पसरवल्यानंतर माधुरी राजकारणात प्रवेश करू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. माधुरी बर्‍याच दिवसांपासून नेत्यांच्या संपर्कात असल्याचेही बोलले जात आहे. बुधवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान ती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत दिसल्याने या अटकळांना जोर आला आहे. वास्तविक, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झाला. ते पाहण्यासाठी माधुरी दीक्षितही आली होती. यावेळी ती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित...17 Nov 2023 / No Comment / Read More »

संस्कृती टिकविण्यासाठी बोलीभाषेची समृद्धी जोपासावी लागेल

संस्कृती टिकविण्यासाठी बोलीभाषेची समृद्धी जोपासावी लागेल– राज्यपाल रमेश बैस यांचे आवाहन, नंदुरबार, (१६ नोव्हेंबर) – इंग्रजीच्या वाढत्या प्रभावामुळे लोक त्यांच्या बोलीभाषेपासून दूर जात आहेत, आपल्या बोलीभाषा नाहीशा झाल्या, तर संस्कृती नष्ट होईल. म्हणून नवीन पिढीने मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इतर भाषा शिकण्याबरोबरच आपल्या बोलीभाषा समृद्धपणे जोपासण्याचे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. नंदुरबार येथे बुधवारी राज्यस्तरीय जनजातीय गौरव दिवस व आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदिवासी विकास मंत्री डॉ....16 Nov 2023 / No Comment / Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते गडचिरोलीतील सीआयआयआयटीचे लोकार्पण

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते गडचिरोलीतील सीआयआयआयटीचे लोकार्पणगडचिरोली, (१६ नोव्हेंबर) – जिल्ह्यात उद्योगाधारित प्रशिक्षणाला चालना देण्यासाठी तसेच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा विकास करण्यासाठी राज्य शासन, जिल्हा प्रशासन व टाटा टेक्नालॉजी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने सेंटर फॉर इन्व्हेंन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँण्ड ट्रेनिंग सेंटर (सीआयआयआयटी) चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञान, उपकरणांनी सुसज्ज अशा या प्रशिक्षण केंद्राची मुख्यमंत्री शिंदे यांनी पाहणी करून माहिती घेतली. या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून केवळ मुलांचे प्रशिक्षणच होणार नाही तर...16 Nov 2023 / No Comment / Read More »