किमान तापमान : 30.71° से.
कमाल तापमान : 34.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 38 %
वायू वेग : 3.51 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
34.99° से.
27.93°से. - 34.99°से.
शुक्रवार, 01 नोव्हेंबर कुछ बादल28.33°से. - 30.85°से.
शनिवार, 02 नोव्हेंबर साफ आकाश28.11°से. - 30.74°से.
रविवार, 03 नोव्हेंबर साफ आकाश27.62°से. - 30.51°से.
सोमवार, 04 नोव्हेंबर साफ आकाश27.62°से. - 30.89°से.
मंगळवार, 05 नोव्हेंबर साफ आकाश27.16°से. - 30.7°से.
बुधवार, 06 नोव्हेंबर साफ आकाशसोलापूर, [२१ मार्च] – मोहोळ – सोलापूर जवळ एका वाहनाने वनवासी दिंडीतील २५ लोकांना चिरडले आहे. यात चौघांचा मृत्यू असून अनेक जण गंभीर जखमी आहेत. हा अपघात आज सोमवारी पहाटे सोलापूर – मोहोळ रस्त्यावर बोडके फार्महाऊससमोर झाला आहे. मृत्युमुखी पडलेले सर्वजण वडाळा गावचे रहिवासी होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामायणानिमित्त काही दिवस वनवासात जाऊन राहण्याची परंपरा सोलापुरातील काही गावांमध्ये आहे. त्यानुसार हे २५ नागरिकांची दिंडी सोलापूर रस्त्याने वनवासात निघाले होते. मात्र त्याचवेळी रस्त्यावरून जाणार्या एक टेम्पो या दिंडीत घुसला आणि सुमारे २५ लोकांना चिरडले. अपघातानंतर टेम्पोचालक घटनास्थळावरून फरार झाला. या दुर्घटनेत दत्तात्रय विठ्ठल शेंडगे, विलास साठे, भाऊसो जाधव आणि जिजाबाई गाडे या चौघांचा मृत्यू झाला आहे. तर २१लोक जखमी झाले असून यातील काही जणांची प्रकृती गंभीर आहे.
जखमींना मोहोळच्या प्राथमिक रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ग्रामीण पोलिसांचे एक पथक घटनास्थळावर दाखल झाले असून चालकाचा शोध सुरू आहे.