|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:01 | सूर्यास्त : 18:45
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.65° C

कमाल तापमान : 28.88° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 67 %

वायू वेग : 4.29 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.88° C

Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.82°C - 31.89°C

few clouds
Weather Forecast for
Thursday, 02 May

27.87°C - 30.58°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 03 May

27.31°C - 29.3°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 04 May

27.55°C - 29.6°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 05 May

28.19°C - 30.6°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

28.32°C - 29.96°C

sky is clear

आसामच्या पाच आदिवासी मुस्लिमांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीचे होणार सर्वेक्षण

आसामच्या पाच आदिवासी मुस्लिमांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीचे होणार सर्वेक्षण– बिहारच्या आकडेवारीनंतर आसाम सरकारचा निर्णय, गुवाहाटी, (०५ ऑक्टोबर) – आसाम राज्यातील पाच मूळ आदिवासी मुस्लिम समाजाच्या सामाजिक-आर्थिक स्थितीचा आढावा घेतला जाणार असल्याचे राज्य सरकारने अलिकडेच सांगितले. यामुळे या समाजाच्या विकासासाठी पावले उचलता येतील. मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी या संदर्भात वरिष्ठ अधिकार्यांची बैठक घेतली. मुख्यमंत्री कार्यालयाने समाज माध्यमावर लिहिले की, जनता भवनमध्ये एका बैठकीदरम्यान मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी संबंधित अधिकार्यांना आसामच्या मूळ आदिवासी मुस्लिम समाजाच्या (गोरिया, मोरिया, देशी,...5 Oct 2023 / No Comment /

तृणमूल खासदार अभिषेक बॅनर्जींना ईडी नोटिस

तृणमूल खासदार अभिषेक बॅनर्जींना ईडी नोटिस-पत्नीलाही सुनावणीसाठी पाचारण, नवी दिल्ली, (०४ ऑक्टोबर) – ईडीने तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तसेच खासदार अभिषेक बॅनर्जी यांना नोटीस पाठवत ९ ऑक्टोबरला सुनावणीसाठी बोलाविले आहे. याशिवाय त्यांची पत्नी रुजिरा यांनाही ११ ऑक्टोबरला उपस्थित राहण्याचा आदेश दिला आहे. माहितीनुसार, ईडीने खासदार अभिषेक बॅनर्जी यांना ३ ऑक्टोबरला शालेय भरती घोटाळा प्रकरणासंबंधी चौकशीसाठी कोलकाता येथील ईडी कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगितले होते. परंतु, आपण राजधानी दिल्लीत असल्याने कोलकात्यात चौकशीसाठी येऊ शकणार नसल्याचे त्यांनी अधिकार्यांना...4 Oct 2023 / No Comment /

देश विभाजित करण्याचा काँग्रेसचा कट

देश विभाजित करण्याचा काँग्रेसचा कट-छत्तीसगडमध्ये मोदींचा हल्लाबोल, जगदलपूर, (०३ ऑक्टोबर) – ज्या समाजाची जितकी लोकसंख्या, संसाधनांवर त्यांचा तितकाच जास्त हक्क, असा सूर काँग्रेस पक्ष विशेषत: या पक्षाचे खासदार राहुल गांधी काढत आहेत. मला त्यांना इतकेच विचारायचे आहे की, या देशात सर्वाधिक लोकसंख्या हिंदूंची आहे, मग हिंदूंना सर्व हक्क देऊन टाकायचे का? अशी विधाने करून काँग्रेस देश विभाजित करण्याचा कट रचत असल्याचे वाटते, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी काँग्रेसवर हल्ला चढविला. या देशात...3 Oct 2023 / No Comment /

…तेव्हाच विकसित भारताचे स्वप्न साकार होईल

…तेव्हाच विकसित भारताचे स्वप्न साकार होईल– पंतप्रधानांच्या हस्ते विकास कामांचे लोकार्पण, जगदलपूर, (०३ ऑक्टोबर) – देशातील राज्ये, जिल्हे आणि गावांचा विकास होईल तेव्हाच विकसित भारताचे स्वप्न साकार होईल. २०१४ पूर्वी दिलेल्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत केेंद्राने गेल्या नऊ वर्षांत छत्तीसगडमधील रेल्वे प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पीय तरतूद २० पटींनी वाढल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सांगितले. ते छत्तीसगडमधील जगदलपूरमध्ये एका कार्यक‘मात बोलत होते. तत्पूर्वी त्यांनी नागरनार येथील एनएमडीसी स्टील प्लांटसह २६ हजार कोटी रुपयांच्या काही प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी केली....3 Oct 2023 / No Comment /

जमिनीच्या वादातून ६ जणांची हत्या

जमिनीच्या वादातून ६ जणांची हत्या– उत्तर प्रदेशातील देवरिया येथील घटना, देवरिया, (०३ ऑक्टोबर) – उत्तरप्रदेशातील देवरिया जिल्ह्यात जमिनीच्या वादातून झालेल्या रक्तरंजित संघर्षात ६ जणांची विटांनी व धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. रुद्रपूर कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फतेहपूर गावातील दोन कुटुंबांमध्ये जमिनीचा जुना वाद होता. सोमवारी सकाळी ८.३० च्या सुमारास दोन कुटुंबांत वाद सुरू झाला. वाद इतका विकोपाला गेला की, दोन्ही बाजूंनी लाठ्या, रॉड, धारदार शस्त्रे आणि बंदुका बाहेर निघाल्या. काही वेळातच दोन्ही...3 Oct 2023 / No Comment /

निवडणुकीपूर्वीच गहलोतांनी पराभव स्वीकारला

निवडणुकीपूर्वीच गहलोतांनी पराभव स्वीकारला– पंतप्रधानांचा राज्य सरकारवर हल्लाबोल, जयपूर, (०२ ऑक्टोबर) – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राज्यात काँग्रेसने सुरू केलेल्या योजना थांबवू नका, अशी विनंती केली आहे. यामुळे त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीच पराभव स्वीकारला आहे, असा टोला हाणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हमी दिली की, काँग्रेस कार्यकाळातील कोणतीही योजना बंद होणार नाही. उलट त्यात सुधारणा करण्यात येईल. चित्तौडगड येथे सोमवारी एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, राजस्थानमध्ये मुख्यमंत्री म्हणून पक्ष...2 Oct 2023 / No Comment /

जात जनगणनेची आकडेवारी जाहीर

जात जनगणनेची आकडेवारी जाहीरपाटणा, (०२ ऑक्टोबर) – बिहारमध्ये जात जनगणनेची आकडेवारी जाहीर झाली आहे. प्रभारी मुख्य सचिव विवेक कुमार सिंह यांनी सोमवारी पाटणा येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. विभागीय माहितीनुसार २१५ जातींची आकडेवारी जारी केले आहे. सरकारी अहवालानुसार, बिहार ३६ टक्के अत्यंत मागास, २७ टक्के मागासवर्गीय, १९ टक्के अनुसूचित जाती आणि १.६८ टक्के अनुसूचित जमाती म्हणून घोषित करण्यात आला आहे. जात जनगणनेची आकडेवारी जाहीर: प्रभारी मुख्य सचिव विवेक कुमार सिंह यांनी सोमवारी...2 Oct 2023 / No Comment /

जातीय तणावानंतर शिवमोग्गामध्ये १४४ लागू

जातीय तणावानंतर शिवमोग्गामध्ये १४४ लागूशिवमोग्गा, (०२ ऑक्टोबर) – कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यातील जातीय तणावानंतर प्रशासनाने रागी गुड्डा भागात सीआरपीसीचे कलम १४४ लागू केले आहे. यासोबतच रागी गुड्ड्यात लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. कर्नाटकातील शिवमोग्गा येथे काल रात्री धार्मिक मिरवणुकीवर दगडफेक झाल्यानंतर हिंसाचार उसळला होता. शिवमोग्गा एसपी जीके मिथुन कुमार यांनी सांगितले की, ’ईद उल मिलाद मिरवणुकीवर काही खोडकर घटकांनी दगडफेक केली होती. यानंतर हिंसाचार उसळला आणि संतप्त लोकांनी वाहने आणि घरांची तोडफोड केली....2 Oct 2023 / No Comment /

ओडिशासह सात राज्यांत भगवान जगन्नाथाची संपत्ती!

ओडिशासह सात राज्यांत भगवान जगन्नाथाची संपत्ती!– ६० हजार एकरपेक्षा जास्त जमीन, भुवनेश्वर, (०२ ऑक्टोबर) – पुरी येथील जगन्नाथ मंदिराच्या नावावर ओडिशा आणि इतर सहा राज्यांमध्ये ६० हजार ८२२ एकरपेक्षा जास्त जमीन आहे. ओडिशाचे कायदा मंत्री जगन्नाथ सारका यांनी सत्ताधारी बिजू जनता दलाचे आमदार प्रशांत बेहरा यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. ओडिशातील ३० पैकी २४ जिल्ह्यांमध्ये महाप्रभू जगन्नाथ यांच्या नावावर ६०,४२६.९४३ एकर जमीन आहे. देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये भगवान जगन्नाथाची यात्रा काढली जाते....2 Oct 2023 / No Comment /

मुख्यमंत्र्यांना चुकांचे परिणाम भोगावे लागतील

मुख्यमंत्र्यांना चुकांचे परिणाम भोगावे लागतील– खाण लीज प्रकरणी झारखंडच्या राज्यपालांचे मत, रांची, (०२ ऑक्टोबर) – मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा समावेश असलेल्या बेकायदेशीर खाण लीज प्रकरणाचा संदर्भ देत, एखाद्याच्या कृतीचे परिणाम भोगावेच लागतात, असे वक्तव्य झारखंडचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन् यांनी रविवारी वृत्तसंस्थेशी बोलताना केले. राज्यातील संघटित गुन्हेगारी आणि नक्षलवादाच्या विरोधात कठोर कारवाईच्या गरजेवर त्यांनी भर दिला. ज्या प्रकारे गुन्हेगारी टोळ्या तुरुंगातून कार्यरत आहेत आणि नक्षलवाद्यांकडून सुरक्षा कर्मचारी मारले जात आहेत, त्याबद्दल राधाकृष्णन् यांनी तीव‘...2 Oct 2023 / No Comment /

पुन्हा सत्तेत आल्यास प्रत्येकाला रोजगार

पुन्हा सत्तेत आल्यास प्रत्येकाला रोजगार– शिवराजसिंह चौहान यांचे आश्वासन, भोपाळ, (३० सप्टेंबर) – मध्यप्रदेशात भाजपाची सत्ता कायम राहिल्यास मी राज्यातील जनतेच्या समस्या सोडवीन. प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्यात येईल, मग ती बचतगट, उद्योग, क्रांती योजना किंवा सरकारी नोकर्या असो, जेणेकरून त्यांना स्थलांतर करावे लागणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिले आहे. मध्यप्रदेशात यावर्षीच्या अखेर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर आदिवासीबहुल अलीराजपूर जिल्ह्यात आयोजित एका जाहीर सभेत ते बोलत होते. चौहान यांच्या...30 Sep 2023 / No Comment /

आईला केविलवाणी हाक, शाळेचा गणवेश!

आईला केविलवाणी हाक, शाळेचा गणवेश!-उज्जैन पीडितेची हृदयद्रावक कहाणी, इंदूर, (३० सप्टेंबर) – उज्जैनमध्ये निष्पाप मुलांवर झालेल्या अत्याचाराने संपूर्ण देश हादरला आहे. मुलीला उपचारासाठी इंदूरच्या एमटीएच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, जिथे तिला शुद्ध आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी शुद्धीवर आल्यापासून ती तिच्या आईला हाक मारत होती. बलात्कार आणि क्रूरतेची शिकार झालेली १५ वर्षीय तरुणी लोकांकडे मदतीची याचना करत होती, तेव्हा ती रक्ताने माखलेली होती आणि मृत्यूच्या उंबरठ्यावर होती, मात्र तिच्या मदतीसाठी कोणीही पुढे येत...30 Sep 2023 / No Comment /